कोल्हापूर : सभासदांच्या लाभांश आणि ठेव व्याजाचे ३ कोटी ३० लाख रुपये खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष राजीव परीट यांनी दिली.
संस्थेच्या रविवारी झालेल्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. परीट म्हणाले, संस्थेला २०२०/२१ या कालावधीमध्ये २ कोटी २३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना साडेबारा टक्के लाभांश १ कोटी ४१ लाख रुपये देण्यात येणार आहे. कायम ठेव व्याजाचे ९७ लाख रुपये आणि वर्गणी ठेव व्याज ९२ लाख रुपये असे ३ कोटी ३० लाख रुपये दोनच दिवसात सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
सभासदांना कर्जावरील व्याज दर १० टक्के करण्यात आला असून कर्जमर्यादा ३५ लाख करण्यात आली आहे. तर आकस्मिक कर्ज मर्यादा ५० हजार करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २६ मृत सभासदांच्या वारसांना १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. १ डिसेंबर २०१९ पासून सेवानिवृत्त झालेल्या १९६ सभासदांचा सत्कार मुख्यालय व शाखा स्तरावर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सभेसाठी उपाध्यक्ष दिनकर तराळ, संचालक एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे, के. आर. किरूळकर, विजय टिपुगडे, शिवाजी काळे, रामदास पाटील, शांताराम माने, सचिन मगर, श्रीकांत वरुटे, बी. के. कांबळे, विष्णू तळेकर, रवींद्र घस्ते, रंजना आडके, गौरी पाटील, संगीता गुजर, एन. डी. पाटील, रणजित पाटील, सुनील मिसाळ, नसीर नाईक, तज्ज्ञ संचालक सयाजी पाटील, विजय गवंडी, सुकाणू समितीचे निमंत्रक एम. एम. पाटील, सदस्य शिवाजी कोळी, राजाराम वरुटे, प्रकाश देसाई, भालचंद्र माने, लालासाे माेहिते, प्रकाश पाटील उपस्थित होते.