शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषिपंप’ कनेक्शनसाठी २८०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 00:37 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निधीअभावी कृषिपंपासाठीच्या वीज जोडण्या प्रलंबित राहून, शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोेरे जावे लागल्याने महावितरणने कर्ज काढून शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तीन वित्तीय संस्थांकडून २८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाणार आहे. या कर्जाला राज्य शासनाने दोन वर्षांची हमीही दिली आहे.विदर्भ, मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना याचा लाभ होणार आहे. निधीअभावी गेल्या वर्षभरात फक्त ८०० जोडण्या होऊ शकल्या. आता या निर्णयामुळे कोल्हापूर व सांगलीतील १५ हजार प्रलंबित जोडण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. कृषिपंपाची थकबाकी नगण्य असतानाही कोल्हापूर, सांगली, साताºयासह उर्वरित महाराष्ट्रातील शेतकºयांना महावितरणकडून वीज जोडणी वेळेत मिळत नाही. याउलट विदर्भ, मराठवाड्यात थकबाकी असतानाही त्यांना मात्र जोडणी देताना हात सैल सोडला जातो. याविरोधी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांनी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज उठविला. महाराज्य इरिगेशन फेडरेशनने सातत्याने मोर्चे, आंदोलने, मंत्र्यांसोबत बैठका या माध्यमांतून वीजजोडणी मिळावी म्हणून सातत्याने आवाज उठविला आहे. त्याला लोकप्रतिनिधींचेही बळ मिळाल्याने प्रलंबित वीजजोडणीच्यामुद्द्याने पेट घेण्यास सुरुवात केली आहे.ऐन विधानसभेच्या तोंडावर हा मुद्दा पेटणे परवडणारे नसल्याचे लक्षात आल्याने सरकारने तातडीने हालचाली करत ‘महावितरण’ने जोडणी देण्यासाठी मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे.२८ जूनला जीआर काढून कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडण्या देण्यासह १०५ नवीन उपकेंद्रे उभारण्याकरिता लागणारा निधी बँकांकडून कर्जाऊ स्वरूपात घेण्यासह या कर्जाला दोन वर्षांसाठीची हमी सरकारने घेतली आहे. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण करा, असेही आदेशाद्वारे सूचित केले आहे.कोल्हापूर, सांगलीत१५ हजार जोडण्या प्रलंबितउर्वरित महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उच्चदाब वितरण प्रणालीच्या अजून १५ हजार जोडण्या प्रलंबित आहेत.यातील मार्च २०१८ पूर्वी मागणी केलेल्या १३ हजार ८९० अर्जांचा समावेश आहे. यातील ८०० जोडण्यांची कामे गेल्या वर्षभरात पूर्ण झाली आहेत; त्यासाठी ३११ कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार कामे झाली आहेत.उर्वरित कामे सुरू असून, निधी उपलब्ध होईल तसे मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. मार्च २०१८ नंतर २२६७ नवीन अर्ज आले आहेत. यात कोल्हापूरचे ८१३ आणि सांगलीचे १४१५ आहेत. निधीअभावी टेंडर प्रक्रिया अद्याप सुरूझालेली नाही.आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. निधी आल्यानंतर टेंडर काढून प्रलंबित जोडण्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत.