शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
9
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
10
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
11
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
12
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
13
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
14
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
15
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
16
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
17
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
18
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
19
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
20
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  

‘किसन वीर’ कारखान्याच्या रणांगणात २८ जण

By admin | Updated: April 23, 2015 00:55 IST

भुर्इंज : पाचजणांची बिनविरोध निवड; राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीपासून दूरच

वाई : किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे २१ पैकी पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतर १६ जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेस पुरस्कृत सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेल व भाजप, शिवसेना, अपक्ष यामध्ये लढत होत आहे. सहा जागांसाठी भाजप-शिवसेनेला उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीने कारखान्यावर कर्ज खूप असल्याने ही निवडणूक न लढविण्याचा या पूर्वीच निर्णय घेतला आहे.ऊस उत्पादक गट क्र. ४ सातारा येथील तीन जागांसाठी सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे मधुकर दिनकर नलवडे (वाढे, ता. सातारा), प्रकाश नारायण पवार (आरफळ, ता. सातारा) व चंद्रकांत बजरंग इंगवले (किडगाव, ता. सातारा) यांचे तीनच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. सोसायटी मतदारसंघात एका जागेसाठी शेतकरी विकास पॅनेलचे नवनाथ निवृत्ती केंजळे (कठापूर, ता. कोरेगाव) यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली.सत्तारुढ पॅनेलला एकूण पाच जागा बिनविरोध मिळाल्या आहेत.ऊस उत्पादक गट क्र. १ कवठे-खंडाळा येथील तीन जागांसाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे राहुल भगवानराव घाडगे (लोणंद), प्रवीण विनायक जगताप (केंजळ), प्रताप ज्ञानेश्वर यादव (गुळुंब) यांच्याविरोधात भाजप-शिवसेनेचे उमेदवार उदय परसराम यादव (पारगाव) व निवृत्ती वामन देशमुख (शिरवळ).ऊस उत्पादक गट क्र. २ भुर्इंज येथे दुरंगी लढत होत आहे. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष मदन प्रतापराव भोसले (भुर्इंज) विद्यमान उपाध्यक्ष गजानन धरमसी बाबर (किकली), मधुकर रामचंद्र शिंदे (जांब) यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार गणपत पांडुरंग शिंगटे (खडकी), अपक्ष उमेदवार विद्यमान संचालक नारायणराव कृष्णाजी पवार (किकली), अविनाश राजाराम जाधव (भुर्इंज).ऊस उत्पादक गट क्र. ३ - वाई, बावधन, जावळी येथे दुरंगी लढत होत आहे. सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक रतनसिंह सर्जेराव शिंदे (वाई), सयाजी विनायक पिसाळ (बावधन), चंद्रसेन सुरेशराव शिंदे (कुडाळ), यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार नंदकुमार आनंदराव नायकवडी (शहाबाग), अमृतराव विठ्ठल शिंदे (कुडाळ), वाई शहर शिवसेना प्रमुख किरण मधुकर खामकर.ऊस उत्पादक गट क्र. ५ - कोरेगाव येथील तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असून, सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक सचिन घनशाम साळुंखे (अंबवडे -संमत), नंदकुमार ज्ञानदेव निकम (सांगवी), विजय आनंद चव्हाण (दहिगाव), यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार बाळू नथू फाळके (सातारारोड).भटक्या विमुक्त जाती जमातीत सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलचे विद्यमान संचालक चंद्रकांत वामन काळे (वाई) व शिवसेनेचे लक्ष्मण रामचंद्र खरात (वाई).महिला राखीव गटातील दोन जागांसाठी तीन अर्ज राहिले असून, सत्तारुढ शेतकरी विकास पॅनेलच्या विजया जयवंत साबळे (शिवथर, ता. सातारा), आशा दत्तात्राय फाळके (सातारारोड, ता. कोरेगाव), यांच्याविरोधात भाजपच्या विजया वसंत भोसले (बावधन). इतर मागास प्रवर्गामध्ये सत्तारुढ विकास पॅनेलचे अरविंद शंकर कोरडे (शहाबाग, ता. वाई) व शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदकुमार आनंदराव नायकवडी यांच्यात लढत होणार आहे. (प्रतिनिधी)