शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

२८ संस्था अवसायनात

By admin | Updated: December 22, 2015 00:57 IST

शाहूवाडी तालुक्यातील सहकारी संस्थांत खळबळ : नऊ बंद, चार कागदावरच

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील २८ सहकारी सेवा संस्था व पतसंस्था, औद्योगिक सहकारी संस्था शासनाच्या सहकार विभागाने अवसायनात काढल्या आहेत. त्यामुळे सहकारी सेवा संस्थांत खळबळ उडाली आहे. यातील नऊ संस्था कायमस्वरूपी बंदअवस्थेत आहेत, तर चार औद्योगिक संस्था कागदावरच आहेत.शाहूवाडी तालुक्यात २११ सहकारी संस्था आहेत. शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा व्हावा, या उद्देशाने गावागावांत सहकारी सेवा सोसायट्या स्थापन झाल्या, तर राष्ट्रीयीकृत बँकांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होत नाही यासाठी पतसंस्था, बहुउद्देशीय संस्थांची स्थापना करण्यात आली. मात्र, तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे सेवा संस्थांच्या कारभाराची घडी विस्कटली. त्यामुळे काही संस्थांचे बोर्ड नावालाच दिसू लागले आहेत. सहकार विभागाने या २८ संस्थांना अवसायनात काढण्याची नोटीस बजाविली आहे. अवसायनात काढलेल्या संस्थांची नावे अशी : जयकिसान विकास सेवा संस्था मलकापूर, केदारलिंग सेवा संस्था शित्तूर-मलकापूर, परखंदळे विकास संस्था परखंदळे, उदय सहकारी पाणीपुरवठा संस्था सुपात्रे, गजानन विकास सेवा संस्था शित्तूर-वारूण, आदर्श विकास सेवा संस्था शित्तूर-वारूण, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था साळशी, निनाईदेवी स्वयंरोजगार सेवा संस्था परखंदळे, मानसिंगराव गायकवाड ग्रा. बि. शे. सहकारी संस्था सुपात्रे, हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्था चनवाड-शाहूवाडी, शिवशक्ती ग्रा. बि. शे. सहकारी पतसंस्था भाडळे, खुटाळवाडी सहकारी धान्य संस्था खुटाळवाडी, श्री दत्त स्वयंरोजगार कृषिपूरक उद्योग सहकारी संस्था शित्तूर-मलकापूर, डोणजाई विकास सेवा संस्था आंबर्डे, कालेश्वर विकास सेवा संस्था शिराळे मलकापूर, शिवभवानी ग्रा. बि. शेती सहकारी संस्था हारुगडेवाडी, भीमजी ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्था खुटाळवाडी, योगिराज ग्रा. बि. शेती पतसंस्था सरूड, हनुमान ग्रा. बि. शेती पतसंस्था ससेगाव, माउली ग्रा. बि. शेती पतसंस्था मालेवाडी, स्वशक्ती अपंग स्वयंरोजगार सेवा उद्योग संस्था वाडीचरण, शिवाई महिला मागासवर्गीय सहकारी निटिंग संस्था उचत, परिवर्तन मागासवर्गीय टेक्सटाईल्स संस्था उचत, आनंदराव मागासवर्गीय निटिंग संस्था उचत, शिवाई मागासवर्गीय सहकारी रवा-मैदा संस्था उचत, महात्मा फुले मागासवर्गीय नागरी पतसंस्था शाहूवाडी, महालक्ष्मी मजूर सहकारी संस्था ससेगाव, श्री दत्त स्वयंरोजगार कृषिपूरक संस्था शित्तूर तर्फ मलकापूर. (प्रतिनिधी)शाहूवाडी तालुक्यातील २८ सहकारी संस्थांना अवसायनात काढण्याची नोटीस बजाविली आहे. मुदत संपल्यानंतर या सर्व संस्थांवर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी त्यांची नोंदणी रद्द केली जाणार आहे.- पी. व्ही. पोवार, सहायक निबंधक.