शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मंडलिक कारखान्याचा २६७५ अंतिम दर

By admin | Updated: September 21, 2015 00:32 IST

संजय मंडलिक : राज्यात सर्वाधिक दराचा दावा; १७ कोटी शेतकऱ्यांना अदा

म्हाकवे : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची देय शिल्लक ऊस बिले १७ कोटी १० लाख २९ हजार रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी दिली. ही बिले २६७५ प्रमाणे अदा केली असून, हा ऊस दर राज्यामध्ये सर्वाधिक असल्याचे त्यांनी सांगितले.प्रा. मंडलिक म्हणाले, ‘कारखान्याने २०१४-१५ च्या गळीत हंगामात ५ लाख ४९ हजार ६७९ मे. टन उसाचे गाळप करून सरासरी १२.९४ टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १२ हजार ३७० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या हंगामात कारखान्याने २८ फेबु्रवारीअखेर गळितास आलेल्या उसास एफआरपी २६७५ रुपयांप्रमाणे ऊस बिले अदा केली होती. त्यानंतर कारखान्याने निधी उपलब्धतेनुसार १ ते १५ मार्च या कालावधीत रुपये १२०० प्र. मे. टन व १६ ते ३१ मार्च या कालावधीत ११०५ प्र. मे. टन प्रमाणे तसेच सोसायटी कर्जे थकीत जाऊ नयेत २६७५ रुपयाप्रमाणे अदा केले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सॉफ्ट लोन कर्ज योजनेअंतर्गत कारखान्यास १७ कोटी १० लाख इतके प्राप्त झाले असून, एफआरपी प्रमाणे देय शिल्लक रक्कम १७ कोटी १० लाख २६ हजार संबंधित श्ोतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. तरी शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले ऊस बिल घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी शेतकऱ्यांना एफ. आर. पी. प्रमाणे रक्कम देण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता रविवरी झाली. कारखान्याने येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ५ लाख ५० हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, आनंदराव फराकटे, बापूसोा भोसले-पाटील, चंद्रकांत गवळी, शिवाजीराव इंगळे, बाबगोंडा पाटील, नंदकुमार घोरपडे, नंदाताई सातपुते, शिवानी भोसले, कामगार प्रतिनिधी संचालक सर्जेराव पाटील, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)