शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

‘ब्रेन मॅपिंग’साठी २५ लाखांची आॅफर

By admin | Updated: November 22, 2015 00:46 IST

समीरची न्यायालयास माहिती : नकार दिल्यास फासावर लटकविण्याची अज्ञात पोलिसाची धमकी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अन्य साथीदारांची नावे सांग, ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी हो म्हण, त्यासाठी तुला माफीचा साक्षीदार बनवून २५ लाख रुपये देतो, असा साहेबांचा निरोप आहे. नाही म्हटलास तर तुला फासावर लटकविण्याची तयारी आम्ही केली आहे, अशी धमकी अनोळखी पोलिसाने आपल्या कानामध्ये ब्रेन मॅपिंग सुनावणीदरम्यान (९ आॅक्टोबर रोजी) दिल्याची धक्कादायक माहिती संशयित समीर गायकवाड याने शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयास दिली. दरम्यान, समीरने केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून ५ डिसेंबर २०१५ पर्यंत न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांनी तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी तपास कामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्यासाठी त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांनी न्यायालयाला सादर केला होता. त्यानुसार समीरला ९ आॅक्टोबरला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी समीरने माझी मानसिक अवस्था ठीक नसल्याने मी चाचणी करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्याने न्या. डांगे यांनी ब्रेन मॅपिंगचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली. आरोपीचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आरोपी समीर हा खटल्याच्यादृष्ठीने गोपनीय तसेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित अशी माहिती देऊ इच्छितो, तरी त्याच्याकडून तशी माहिती लेखी स्वरूपात घेऊन न्यायालयात हजर करण्याबाबत कारागृह अधीक्षकांना आदेश व्हावा, असा अर्ज सादर केला होता. तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे शनिवारच्या सुनावणीसाठी समीरला न्यायालयात हजर करावे, असा विनंती अर्ज अ‍ॅड. एम. एम. सुहासे यांनी न्यायालयास केला होता. तो न्यायालयाने मंजूर केला; परंतु पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. यादव यांच्यासमोर हजर केले. यावेळी समीरने न्यायालयासमोर गोपनीय माहिती उघड केली. माहिती सांगत असतानाही त्याची नजर कॅमेऱ्यावर भिरभिरत होती. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले, विवेक घाटगे, समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर, अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी) समीर गायकवाडचा गौप्यस्फोट ४व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरने न्यायालयास गोपनीय माहिती दिली. त्यामध्ये माझ्या ब्रेन मॅपिंग चाचणीच्या सुनावणीदरम्यान ९ आॅक्टोबरला न्यायालयात जात असताना एक अनोळखी व्यक्ती जवळ आली. त्याने मी पोलीस असल्याचे सांगत तुला साहेबांचा निरोप आहे. पोलिसांवर सामाजिक संघटनांचा दबाव आहे. आम्ही सांगतो त्या साक्षीदारांची नावे सांग. तू ब्रेन मॅपिंग चाचणीसाठी हो म्हण, तुला २५ लाख रुपये देऊन माफीचा साक्षीदार बनवितो. नाही म्हटलास, तर तुला फासावर लटकविण्याची तयारी आम्ही केली आहे. तसेच तुझ्या घरच्यांनाही त्रास देणार, अशी धमकी आपल्या कानामध्ये दिल्याची माहिती दिली. अडचणी नि:संकोचपणे सांग न्या. यादव यांनी समीरला ‘दोन्ही वकिलांचा युक्तिवाद तू ऐकला आहे. तू सध्या न्यायालयीन कोठडीत आहेस. तपासासंदर्भात किंवा वैयक्तिकदृष्ट्या काही तक्रार असेल, तर फौजदारी प्रक्रियेनुसार काही तरतुदी आहेत. त्या तुला पूर्ण कराव्या लागतील. तुला जी काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे ती तू सांगू शकतोस. तसेच तक्रारी या योग्य त्यावेळी कराव्यात. दुसऱ्या अडचणी असतील तर नि:संकोचपणे न्यायालयास सांग’ असे सांगितले. कोठडीत वाढ समीर गायकवाडच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्याच्या गैरहजेरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू. टी. मुसळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी त्यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत ५ डिसेंबरपर्यंत वाढ केली. समीरला न्यायालयासमोर काही बोलायचे आहे; परंतु सरकारी यंत्रणा त्याला ते सांगण्याची संधी उपलब्ध करून देत नव्हती. त्याची मुस्कटदाबी करण्याचा ते प्रयत्न करीत होते. ब्रेन मॅपिंग सुनावणीनंतर तीन सुनावण्या झाल्या. त्यापैकी एकाही सुनावणीसाठी त्याला हजर केलेले नाही. शनिवारी त्याने न्यायालयास दिलेल्या माहितीचा योग्य दिशेने तपास व्हावा. - अ‍ॅड. एम. एम. सुहासे, आरोपीचे वकील समीर गायकवाडला पुन्हा न्यायालयात हजर करण्याची काहीही गरज नाही. त्याला जे काही सांगायचे होते ते लेखी पत्रव्यवहाराद्वारे तो सांगू शकत होता. त्याने जी माहिती न्यायालयास दिली त्याची चौकशी व्हावी; परंतु केवळ प्रसिद्धी व जामीन मंजूर करण्यासाठी त्याच्या वकिलांच्या उठाठेवी सुरू आहेत. - अ‍ॅड. विवेक घाटगे, फिर्यादीचे वकील