शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बाजार समितीच्या खर्चात २५ लाखांची वाढ

By admin | Updated: June 28, 2016 00:46 IST

प्रशासकच बरे म्हणण्याची वेळ : संचालकांचा आठ महिन्यांतील कालावधी विचार करायला लावणारा

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --बाजार समितीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीपेक्षा ४७ लाख ७८ हजारांनी वाढ झाली असली तरी खर्चात मात्र २४ लाख ८९ हजारांनी वाढ झाली आहे. प्रशासकीय काळापेक्षा पंचवीस पटींनी खर्चात वाढ झाली असून, त्याचा परिणाम वाढाव्यावर होऊन १५ लाख ९० हजारांनी तुलनात्मक वाढावा कमी झाला आहे. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात संचालकांना जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी मिळूनही वाढलेला खर्च पाहता, तो निश्चितच विचार करायला लावणारा आहे. साडेसहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या या समितीचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. मागील पाच वर्षांत संचालक मंडळाने केलेल्या कारभारामुळे समितीवर प्रशासक आले. प्रशासकांच्या दोन-अडीच वर्षांच्या कार्यकाळात उत्पन्नवाढीबरोबरच खर्चावर अंकुश राहिला. डॉ. महेश कदम व रंजन लाखे यांनी प्रशासक म्हणून येथे चांगले काम केले. समितीमध्ये सुरू असलेल्या खर्चाच्या जुन्या रूढी-परंपरांना पायबंद घालून त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. जुलै २०१५ मध्ये प्रशासकीय कारकिर्द संपुष्टात येऊन नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले. मागील संचालकांनी समितीची अब्रू वेशीवर टांगल्याने नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात सभासदांची माफी मागत पुन्हा असा कारभार होणार नाही, असे सांगितले होते. नवीन संचालक मंडळ कार्यरत होऊन दहा महिन्यांचा कालावधी गेला आहे. या कालावधीत त्यांनी समितीच्या शिलकीतील सव्वादोन कोटींच्या रस्त्यासह वे ब्रिज, प्रवेशद्वारांची कामे केली आहेत. या कामांच्या उद्घाटनप्रसंगी नेत्यांनी संचालकांचे कौतुक केले असले तरी प्रशासकीय काळापेक्षा खर्चात झालेली वाढ निश्चितच विचार करायला लावणारी आहे. प्रशासक हा एकटा आणि संचालक मंडळ २१ जणांचे असले तरी खर्चात झालेली वाढ अनाकलनीय आहे. प्रशासकीय काळातील खर्च वाढीच्या प्रमाणापेक्षा पंचवीस पटींनी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची, तर संचालकांच्या दृष्टीने चिंतनाची बाब आहे.ताळेबंदासाठी लपवाछपवी!मार्च महिन्यानंतर सर्व विभागांचे उत्पन्न व खर्च यांचा ठोकताळा घालून वाढावा काढला जातो. साधारणत: एप्रिल महिन्यात समिती प्रशासनाकडे याची माहिती तयार असते; पण यावर्षी खर्चात वाढ झाल्याने ही माहिती देण्यासाठी प्रशासनाने गेले दोन महिने लपवाछपवी सुरू केल्याची चर्चा समितीत सुरू आहे. घोषणांच्या पावसात शेतकऱ्यांची दिशाभूलटेंबलाईवाडी धान्य बाजार, फूल बाजार, गूळ निर्यात झोन, शीतगृह प्रकल्प, आदींच्या घोषणांचा पाऊस समितीच्या गेल्या अनेक निवडणुकांत नेत्यांनी पाडला. आतापर्यंत थापा मारल्या, आता काही तरी करा, असे सांगण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.