शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर आॅडिट’साठी अडीच कोटी

By admin | Updated: August 13, 2016 00:39 IST

ठेकेदार निश्चित : स्थायी समिती सभेत निविदा मंजूर; गळती दूर होणार

कोल्हापूर : महानगरपालिका शहर पाणीपुरवठा विभागामार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी स्थायी समितीने शुक्रवारी ठेकेदाराची नियुक्ती केली. पाण्याच्या लेखापरीक्षणामुळे (वॉटर आॅडिट) शहरातील पाणीपुरवठ्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला जाईल, तसेच हायड्रॉलिक मॉडेलिंग व जीआयएस मॅपिंग केले जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील गळती दूर होऊन शहरातील वितरणनलिकांचे रेखाचित्रे, आराखडे तयार होतील. या लेखापरीक्षणासाठी तब्बल दोन कोटी ३६ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण आतापर्यंत कधीही झाले नव्हते. त्यामुळे पाणीउपसा आणि प्रत्यक्ष होणारे बिलिंग यात मोठी तफावत होती. गळतीचे प्रमाण मोठे असल्याने नुकसान सोसावे लागत होते. जमिनीखालून कोठून जलवाहिनी गेल्या आहेत याचे कोणतेही रेखाचित्र महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे जलवाहिन्यांना कोठे गळती आहे, हे कळत नाही. त्यामुळे पाण्याचे लेखापरीक्षण आणि सॅटेलाईट इमेज तसेज भूगर्भातील जलवाहिन्यांची फोटो इमेज घेऊन त्याद्वारे रेखाचित्रे तयार केली जाणार आहेत. ज्यामुळे जेथे गळती आहे, त्या ठिकाणीच खुदाई करणे सोयीचे होऊन वेळ व खर्चाची बचत होणार आहे. पुण्यातील एस.जी.आय.ए. स्टुडिओ इंजिग्नेरिया इंडिया प्रा. लि. या कंपनीला लेखापरीक्षणाचे काम देण्यात आले आहे. स्थायी समितीने शुक्रवारी त्यावर मोहर उमटविली. स्पॉट बिलिंगसाठी मीटर रीडर कार्यक्षमपणे काम करीत नाही. त्यांना स्पॉट बिलिंगच करायचे नाही. त्यामुळे मानधनावरील कमी केलेल्या मीटर रीडरना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी सभेत झाली. पाण्याची बिले वाढून येत आहेत. चुकीच्या पद्धतीने बिलांची आकारणी झाल्यामुळे नागरिकांना भुर्दंड बसत आहे, अशी तक्रार सत्यजित कदम, उमा इंगळे यांनी केली. शहरात रस्ताखुदाईसाठी १७७५ रुपये दर आकारण्यात येतो, तो ७०० रुपये करण्यात यावा, अशी मागणी जयश्री चव्हाण यांनी केली. तसा ठराव त्यांनी दिला. यावेळी झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, निलोफर आजरेकर, प्रतिज्ञा निल्ले, सूरमंजिरी लाटकर, अजित ठाणेकर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी) रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ पाणीपुरवठा तसेच प. व डि. विभागाकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिवसाला ४१४ रुपये रोजंदारी देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यापूर्वी २३६ रुपये रोजंदारी दिली जात होती. या निर्णयाचा लाभ २०० कर्मचाऱ्यांना होणार आहे.