शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २५ कोटी मिळणार

By admin | Updated: May 19, 2016 00:42 IST

अधिवेशनात घोषणेची शक्यता : वास्तुसंवर्धन, भाविकांना सुविधा, आपत्ती व्यवस्थापनासह विकासकामे होणार

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात २५ कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. या रकमेत वास्तुसंवर्धन, भाविकांना सुविधा व आपत्ती व्यवस्थापन ही विकासकामे करण्यात येणार आहेत. अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी महापालिकेने २५५ कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. यातून मंदिराचा तीन टप्प्यांमध्ये विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७२ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. या टप्प्यातील विकासकामांबाबतची बैठक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात एकाच तीर्थक्षेत्राला एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करता येणार नसल्याने २५ कोटींच्या कामांची निश्चिती करण्यात आली आहे. जून-जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांंतर्गत या निधीला मंजुरी मिळणार आहे. त्यानुसार मंदिर वास्तू संवर्धन देवस्थानच्यावतीने तर परिसरातील उद्यान, कारंजे, स्वच्छतागृह ते जुना राजवाडा ही कामेमहापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहेत. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी दर्शन मंडप, पादचारी मार्ग, सुविधा केंद्र, वाहनतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सेवावाहिन्या हलविणे ही कामे करण्यात येणार आहेत. दिशादर्शक फलक, जाहिरात, सूचना फलक या कामांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठीची प्रस्तावित कामे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्याचे नियोजन आहे. आराखड्यात एकाच शाळेचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात मंदिराला लागून असलेल्या विद्यापीठ हायस्कूलचा समावेश आहे. येथे भाविकांना विश्रांतीची सोय व बगीचा करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळेनेही स्थलांतराची तयारी दाखविली होती. या दोन्ही शाळा मध्यवर्ती परिसरात आहेत. शिवाय येथे मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, त्यामुळे अद्याप शाळांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला नाही. याबाबत शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सुट्यांमुळे तो होऊ शकला नाही. मंदिरासाठी देवस्थानची ५ कोटींची तरतूद मंदिराच्या चारही दरवाज्यांच्या आत असलेल्या मुख्य परिसरासाठी देवस्थान समितीकडून ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य मंदिर, नगारखाना, परिसरातील ओवऱ्या या हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन तसेच संरक्षक भिंतीचे काम या रकमेतून करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांनी दिली. तसेच भक्त निवासाची जबाबदारीही देवस्थानकडे निश्चित करण्यात आली आहे.