शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आयकर भरणाऱ्या ३४०० शेतकऱ्यांकडून २.४० कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:24 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पी. एम. किसान पेन्शन योजनेतील अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आयकर भरणाऱ्या ३८३२ शेतकऱ्यांपैकी ३४०० शेतकऱ्यांनी दोन कोटी ४० लाख रुपये सरकारला परत केले आहेत. उर्वरित ४३२ शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठी मंगळवार (दि. ८)पर्यंत मुदत दिली आहे.

शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या वतीने वार्षिक सहा हजार रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यातून पाच लाख ३७ हजार २१ शेतकऱ्यांनी पी. एम. किसान योजनेत सहभाग घेतला हाेता. चुकीची माहिती भरून पेन्शन योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या वतीने संबंधित खात्यांची चौकशी सुरू केली. यामध्ये निकषांचे उल्लंघन केलेले १८ हजार लाभार्थी आढळले. त्यांमध्ये ३८३२ शेतकरी हे आयकर भरणारे असल्याचे स्पष्ट झाले. आयकर विभागानेच ही यादी दिल्याने शासनाकडून त्यांची वसुली सुरू केली. संबंधित शेतकऱ्यांना लाभ घेतलेली रक्कम परत करण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या कालावधीत ३४०० शेतकऱ्यांनी २ कोटी ४० लाख रुपये शासनाला परत केले आहेत. अजून ४३२ शेतकऱ्यांनी पैसे भरलेले नाहीत. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महसूल यंत्रणा त्यात गुंतली होती. त्यात काही सुट्ट्या आल्याने आणखी तीन दिवस म्हणजेच मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. या कालावधीत पैसे भरले नाहीत तर बुधवारपासून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

आयकर भरणाऱ्यांसह जमीन नावावर नसलेले, तरुण, पती-पत्नी दुहेरी लाभ घेतलेलेही आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या श्रावणबाळ, संजय गांधीसह इतर पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या ३७५० लोकांनी ‘पी. एम. किसान’चा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडूनही वसुली केली जाणार आहे. त्यांना आठवड्यात नोटिसा काढून डिसेंंबरअखेर वसुली केली जाणार आहे.

-------------------------------------------

कारवाईची शेतकऱ्यांमध्ये धास्ती

शासनाने पैसे परत न करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. त्यामुळेच आयकर भरणाऱ्यांनी तातडीने पैसे परत केले.

-------------------------------------------

लाभार्थ्याकडून पैसे वसूल करण्याची पहिलीच वेळ

चुकीच्या पद्धतीने शासकीय अनुदान घेतलेल्यांकडून वसुलीच्या घटना घडल्या असतील. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वसुली करण्याची ही पहिलीच वेळ आहे.