शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
2
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
3
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
4
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
5
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
6
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
7
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
10
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
11
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
12
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
13
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
14
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
15
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
16
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
17
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
18
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
19
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
20
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

जयसिंगपूरकरांना २४ तास पाणी

By admin | Updated: November 24, 2014 23:05 IST

योजनेसाठी हायटेक यंत्रणा : साडेआठ कोटींचा प्रस्ताव; नगरपालिका करणार नियोजन

संदीप बावचे - जयसिंगपूर -शहरात पाणीपुरवठ्याची हायटेक यंत्रणा करण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने विकासात्मक पाऊल टाकले आहे. वॉटर आॅडिट योजनेनंतर नळ पाणीपुरवठा, जॅकवेलचे विस्तारीकरण, जलशुद्धिकरणाचे नूतनीकरण, दहा लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी व त्यासाठी आवश्यक वितरण नलिका अशी साडेआठ कोटी रुपयांची योजना शहरात राबविली जाणार आहे. सन १९६७ मध्ये उदगाव येथील कृष्णा नदीवरून जयसिंगपूर शहरासाठी नळ पाणी योजना राबविताना २५ हजार लोकसंख्या गृहित धरून ती करण्यात आली होती. त्या काळात चिपरी गावालाही पाणीपुरवठा केला जात होता. टप्प्याटप्प्याने वाढलेली उपनगरे, लोकसंख्या, आदींमुळे पुरेसा पाणीपुरवठा करणे अडचणीचे ठरले होते. सन २००६ ते २०११ या काळात पाणी साठवणूक क्षमता कमी प्रमाणात होत असल्यामुळे पाणीपुरवठा करण्यामध्ये असमतोलपणा निर्माण झाल्याचा प्रश्न पुढे आला होता. यावेळी नगरसेवक व प्रशासन यंत्रणेने पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएटी या योजनेतून दहा कोटी ऐंशी लाखांचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामध्ये अजिंक्यतारा सोसायटी येथे सात लाख, दिन बंधू येथे पाच लाख लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. यामुळे शहरातील राजीव गांधीनगर, दत्त कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, हेरवाडे कॉलनी, खामकर मळा या भागाला पाणीपुरवठा करणे शक्य झाले. दरम्यान, शासनाच्या अन्य निधीतून व पालिकेच्या फंडातून शाहूनगरमध्ये सात लाख, आंबेडकर सोसायटीत दोन लाख, आठवी गल्लीत दोन लाख, नोकर हौसिंग सोसायटी येथे तीन लाख क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. विस्तारित शहरामुळे या पाण्याच्या टाक्या आवश्यक होत्या. शहराला मीटर पद्धतीने पाणी पुरवठ्यास प्रारंभ झाल्यानंतर जल व ऊर्जा लेखा परीक्षण (वॉटर आॅडिट) ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ग्राहक सर्वेक्षण, जल लेखा परीक्षण, ऊर्जा लेखा परीक्षण, पाणी मोजमाप यंत्र, भविष्यातील नियोजित आराखडा, जी.आय.एस. (वेबसाईट) प्रणाली आणि मीटर रीडिंग यंत्रणा यावर हा निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे पाणी उपसा होणाऱ्या ठिकाणापासून ते वितरण प्रणालीपर्यंत पाण्याची मोजदाद करणे सोईस्कर बनले आहे. वॉटर आॅडिट योजना राबविण्यात आल्यानंतर या योजनेवर काम करणाऱ्या जीवन प्राधिकरण व खासगी एजन्सीने दिलेल्या अहवालानुसार सध्याच्या पाणीपुरवठा योजना कमकुवत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अद्ययावत अशी पाणीपुरवठा योजना राबविण्याच्या शिफारशीनुसार शासनाचा पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेने पाणी योजना हायटेक बनविण्याच्या दृष्टिकोनातून पुढाकार घेण्याचे धोरण निश्चित केले आहे. सध्या असलेल्या जॅकवेलचे विस्तारीकरण करण्याबरोबरच जलशुद्धिकरण केंद्राचे नूतनीकरण, जुनी खराब झालेली दगडी टाकी, ई-वार्ड टाकीच्या जागी दहा लाख लिटर्स क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधणे, त्यासाठी आवश्यक वितरण नलिका, असा साडेआठ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा ठराव नुकताच विशेष सभेत मंजूर केला आहे. २४ तास पाणीनळ पाणीपुरवठ्याच्या नव्याने प्रस्तावित असणाऱ्या या योजनेतून येत्या २५ वर्षांत शहरातील पाणीपुरवठा अद्ययावत करण्यात येणार असून, सुमारे एक लाख नागरिकांना पाणीपुरवठा होईल, असा आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात शंभर टक्के नळांना मीटर व पाण्याचा स्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास नळाला २४ तास पाणी देण्याची योजना नगरपालिकेकडून भविष्यात सुरू करण्यात येईल, असा आशावाद माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अस्लम फरास यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.योग्य नियोजनयाव्यतिरिक्त शहराच्या शाहूनगर, आंबेडकर सोसायटी, लक्ष्मी पार्क यांसह उर्वरित भागांत तांत्रिकदृष्ट्या योग्य व अचूक पाण्याच्या पाईपलाईनही टाकण्यात येणार आहेत.