शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

सहा महिन्यांत २३ खून

By admin | Updated: July 13, 2015 00:06 IST

जिल्ह्यातील चित्र : महिन्याला सरासरी चार खुनांची होते नोंद

एकनाथ पाटील- कोल्हापूर -राजकीय, सामाजिक, जमीन, मालमत्ता, आर्थिक व्यवहारांसह कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आदी कारणांतून गेल्या सहा महिन्यांत २३ खून पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. महिन्यात सरासरी चार खुनांची नोंद गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आतापर्यंत २१ खुनांचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले तरी ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यासह आणखी एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस रात्रीचा दिवस करीत आहेत.जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची दर महिन्याला गुन्हेविषयक बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक घेत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना चांगलेच ‘खडे बोल’ सुनावले जातात; परंतु त्याचा परिणाम प्रत्यक्ष कामावर होताना दिसत नाही. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या घटनेने तसेच आरोपी अद्यापही न सापडल्याने कोल्हापूर पोलिसांचा चेहरा काळवंडला आहे. त्यातच चेन स्नॅचिंगमध्ये तरुणींचाही सहभाग स्पष्ट झाल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दोन खुनांचे गूढ कायम ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येबरोबरच करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील पाझर तलावात, खून करून पोत्यात बांधून टाकलेल्या ३५ वर्षांच्या तरुणाच्या खुनाचे गूढ अद्यापही कायम आहे. या दोन्ही खुनांचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.खुनाची शाश्वती नाहीखून करण्याआधीच खून कोणाचा, कधी, कुणामार्फत याची व्यवस्था करण्याबरोबरच काही पोलिसांशी गोपनीय पद्धतीने अर्थपूर्ण वाटाघाटी (सेटलमेंट) करण्याचे धैर्य गुन्हेगारांमध्ये आहे. वर्चस्ववादात आड येईल त्याला संपविण्याचे सूत्रच गुन्हेगारांनी अवलंबिले आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्कता घेत आहेत.गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्न करीत आहोत. सराईत गुन्हेगारी टोळ्यांना ‘मोक्का,’ तर गुंडांना हद्दपार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यासह अन्य दोन खुनांचे गुन्हे लवकरच उघडकीस येतील, असा आम्हाला विश्वास आहे. - एस. चैतन्या,अप्पर पोलीस अधीक्षक