शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

२३ नगरसेवकांना दे धक्का !

By admin | Updated: August 6, 2015 23:54 IST

महापालिका आरक्षण फेरसोडत : अनेकजण सौभाग्यवतींच्या आडून मारणार ‘एंट्री’

कोल्हापूर : महापालिकेने गुरुवारी काढलेल्या आरक्षणाच्या फेरसोडतीत २३ नगरसेवकांना थेट फटका बसला. त्यांना स्वत: नगरसेवक म्हणून सभागृहात येता येणार नसले तरी पत्नी किंवा कुटुंबातील अन्य कुणाला तरी रिंगणात उतरवून ‘कारभारी’ नगरसेवक होण्याचा मार्ग मात्र मोकळा आहे. काही मतदारसंघांत आरक्षण बदलले तरी ते विद्यमान नगरसेवकांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे ओहत.सर्वसाधारणपणे परिक्षित पन्हाळकर, इंद्रजित बोंद्रे, इंद्रजित सलगर, सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, संदीप नेजदार, चंद्रकांत घाटगे, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रकाश पाटील, मृदुला रमेश पुरेकर, महेश कदम, प्रकाश गवंडी, सचिन खेडेकर, सर्जेराव पाटील, किरण शिराळे, निशिकांत मेथे, श्रीकांत बनसोडे, रमेश पोवार, मोहन गोंजारे, रविकिरण इंगवले, दिलीप भुर्के, मधुकर रामाणे आदी नगरसेवकांना यावेळी निवडणूक लढविता येणार नाही.नशीबवान नगरसेवक वंदना सुभाष बुचडे, आदिल फरास, प्रकाश नाईकनवरे, प्रतिभा नाईकनवरे, अपर्णा आडके, जयश्री हरिदास सोनवणे, संभाजी जाधव, संजय मोहिते, पल्लवी नीलेश देसाई, महेश जाधव, राजाराम गायकवाड, सरस्वती दिलीप पोवार, वंदना विश्वास आयरेकर, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, कांचन कवाळे, दीपाली ढोणुक्षे, महेश सावंत आदी नगरसेवक नशीबवान ठरले आहेत. त्यांचे प्रभाग आरक्षणाच्या जंजाळातून सुटले असून त्यांना त्यांच्या प्रभागातून निवडणूक लढविता येणार आहे.सौभाग्यवती रिंगणात उतरणार भाजपचे कार्यकर्ते सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील, नगरसेवक रविकिरण इंगवले, चंद्रकांत घाटगे, भूपाल शेटे, सचिन खेडेकर, माजी महापौर बाबू फरास, माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे, तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्क प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बावड्यात सतेज पाटील गटात चुरसकसबा बावड्यातील प्रभाग क्रमांक एक शुगर मिल हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. तिथे सुभाष बुचडे हे प्रबळ दावेदार आहेत. कसबा बावडा हनुमान तलाव हा तीन क्रमांकाचा प्रभाग खुला होता. तो आता ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. तिथे डॉ. संदीप नेजदार यांनी पत्नीस रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. शिवसेनेकडून राहुल माळी यांच्या कुटुंबातील महिलेची चर्चा आहे. कसबा बावडा पॅव्हेलियन (प्रभाग क्रमांक ४) हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असून तिथे सुरेश चौगले यांची पत्नी गीता यांना रिंगणात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. लक्ष्मीविलास पॅलेस या ओबीसी मतदारसंघातून माजी नगरसेवक अशोक जाधव, शहाजी मासाळ, प्रकाश पिंगळे यांची नावे स्पर्धेत आहेत.शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत ‘धुमशान’महापालिकेने ३१ जुलैला घेतलेल्या सोडतीत शिवाजी पेठ, ताराबाई पार्कसह कसबा बावडा परिसरातील बहुतांशी प्रभाग खुले झाले होते; परंतु फेरसोडतीत बावड्यात पुन्हा तीन मतदारसंघ आरक्षित झाले. मंगळवार पेठ व शिवाजी पेठ या शहराच्या गाभ्यातील बहुतांशी प्रभाग खुले झाले. ताराबाई पार्क हा खुला असणारा प्रभाग ओबीसी झाला तरी त्याच्या शेजारचे नागाळा पार्क, रमणमळा, व्हिनस कॉर्नर, कनाननगर, शिवाजी पार्क हे प्रभाग खुलेच राहिले.महापौर ठरविणारे अकरा प्रभागकोल्हापूर : आगामी महापौरपद ‘नागरिकांचा मागासवर्ग महिले’साठी आरक्षित आहे. अकरा प्रभाग त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या प्रभागांतील लढतींना मोठे महत्त्व येणार आहे.‘नागरिकांचा मागासवर्ग महिलां’साठी आरक्षित झालेले प्रभाग असे : पोलीस लाईन, सर्किट हाऊस, बाजारगेट, महालक्ष्मी मंदिर, यादवनगर, राजारामपुरी-तवणाप्पा पाटणे हायस्कूल, सुभाषनगर, राजलक्ष्मीनगर, सानेगुरुजी वसाहत, मध्यवर्ती सभागृह आणि रायगड कॉलनी-बाबा जरगनगर.अशी बदलली आरक्षणे नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाल्यामुळे त्याचा परिणाम थेट १८ प्रभागांचे आरक्षण बदलण्यात झाला, तर ५३ प्रभागांवर पूर्वीचेच आरक्षण पडले. एकूण ७ सर्वसाधारण प्रभागांचे आरक्षण बदलले. त्यातील ५ प्रभागांवर ‘नागरिकांचा मागास प्रवर्गा’चे, तर दोन प्रभागावर ‘सर्वसाधारण महिला प्रवर्गा’चे आरक्षण पडले. एकू ण ६ ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ आरक्षण असलेले बदलले, त्यापैकी ५ सर्वसाधारण झाले, तर एक ‘सर्वसाधारण महिला प्रभाग’ झाला. ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला’असे आरक्षण असलेल्या २ प्रभागांपैकी एका प्रभागावर ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’, तर दुसऱ्यावर ‘सर्वसाधारण’ आरक्षण राहिले. याआधी ‘सर्वसाधारण महिलांसाठी’च्या ३ प्रभागांपैकी अनुक्रमे ‘सर्वसाधारण’, ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग’ व ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला’ असे आरक्षण पडले. पोलीस बंदोबस्तात झाले आ‘रक्षण’कोल्हापूर : कसबा बावडा रस्त्यावरील ड्रीमवर्ल्डपासूनच जागोजागी थांबून असलेले पोलिसांचे जत्थे, सगळीकडे लावलेले बॅरिकेटस, आरक्षणाच्या ठिकाणी उपस्थित असलेले हत्यारधारी पोलीस यामुळे आरक्षण सोडत आहे की प्रत्यक्ष मतमोजणी असा भास रमणमळ््यातील बहुउदेशीय सभागृहात जाणवत होता. प्रचंड बंदोबस्तात व तणावाखालीच सुमारे दोन तास ही प्रक्रिया पार पडली.हीच प्रक्रिया ३१ जुलैला जेव्हा राबविली तेव्हा मोजकेच चार-पाच पोलीस उपस्थित होते; परंतु गुरुवारी मात्र बरोबर त्याच्या उलटे चित्र होते. वाहतूक शाखेचे पोलीस ड्रीमवर्ल्डजवळच थांबले होते. वाहने तिथेच अडविण्यात आली. त्यानंतर बहुउद्देशीय सभागृहाकडे जाणारे दोन्ही मार्ग लोखंडी बॅरिकेटिंगने अडविले होते. तिथेही पोलिसांचे पथक थांबून होते. स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी पावणेअकराच्या सुमारास या प्रक्रियेची पाहणी केली. सभागृहातही जागोजागी लोखंडी बॅरिकेटिंग उभा करून मार्ग रोखण्यात आले होते. ही प्रक्रिया बरोबर अकरा वाजता सुरू झाली. मतमोजणीचीच रंगीत तालीम३१ जुलैची आरक्षण सोडत रद्द ठरविल्याने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याच्या भावनेने अनेक इच्छुकांत नाराजीचा सूर लक्षात घेता प्रशासनाने महसूल भवन येथे मोठा पोलीस बंदोबस्त मागविला होता. यामध्ये स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, अनिल पाटील, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा, एलआयबी, शहर वाहतूक नियंत्रण शाखा असे पाच पोलीस निरीक्षक आणि एक दंगलविरोधी पथक, तीन स्ट्रायकिंग फोर्स असा १२५ हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता.यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, किशोर घाटगे, पद्माकर कापसे, सुनील जाधव, राहुल बंदोडे उपस्थित होते. भाजपचे नगरसेवक सुभाष रामुगडे, संदीप देसाई, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, रमेश पोवार, सुनील पाटील, निरंजन कदम, भूपाल शेटे, हेमंत पाटील काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अशोक जाधव, प्रदीप उलपे आदी उपस्थित होते.