शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘एकटी’कडे २२ टन प्लास्टिकचा ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:57 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात कचरा, प्लास्टिक हा यक्षप्रश्न बनला असून, कोल्हापुरानेही आता प्लास्टिकबंदीचे पाऊल उचलले आहे; पण ‘एकटी’ या कचरावेचक महिलांच्या सामाजिक संस्थेने कचऱ्यातून निवडलेले निरुपयोगी सुमारे २२ टन प्लास्टिक जमा करून घेण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. महाडिक वसाहतीमधील जागेत हे प्लास्टिकचे ढीग दिवसेंदिवस वाढत ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात कचरा, प्लास्टिक हा यक्षप्रश्न बनला असून, कोल्हापुरानेही आता प्लास्टिकबंदीचे पाऊल उचलले आहे; पण ‘एकटी’ या कचरावेचक महिलांच्या सामाजिक संस्थेने कचऱ्यातून निवडलेले निरुपयोगी सुमारे २२ टन प्लास्टिक जमा करून घेण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केल्याचे दिसत आहे. महाडिक वसाहतीमधील जागेत हे प्लास्टिकचे ढीग दिवसेंदिवस वाढत असल्याने संस्थेसमोर हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.‘एकटी’ संस्थेतर्फे कचरावेचक महिलांच्या वतीने शहराच्या प्रत्येक प्रभागातील रोज २७०० घरांतील कचरा, भाजी मंडईतील कचरा जमा करून त्याचे विलगीकरण केले जाते. या कचºयातील निरुपयोगी प्लास्टिक बाजूला काढून इतर कचºयापासून खतनिर्मिती केली जाते. १४ जून २०१६ च्या शासकीय अध्यादेशानुसार निरुपयोगी प्लास्टिक जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही त्या-त्या महापालिकेची आहे. त्यातच ‘एकटी’ संस्थेसोबत कोल्हापूर महापालिकेने जुलै २०१७ मध्ये करार केला. त्यामध्ये मनपा हद्दीतील भाजीपाला व फळ मार्केट, हॉटेल तसेच व्यापारी परिसरातील दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा संकलन व ओला-सुका कचरा असे विलगीकरण करून त्यातून निघणारे निरुपयोगी प्लास्टिक मनपाकडे जमा करावे, असेही स्पष्ट म्हटले आहे.कचºयातून निघणारे निरुपयोगी प्लास्टिक एकत्र करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मार्केट यार्ड परिसरातील महाडिक वसाहत येथे सव्वादोनशे स्क्वेअर फूट जागेतील शेड दिले आहे; पण जुलैपासून आजपर्यंत या ठिकाणचे प्लास्टिक महापालिकेने उचललेच नाही; त्यामुळे हा ढीग वाढून आता तो शेडबाहेर रस्त्यावर आला. ते उचलावे यासाठी ‘एकटी’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी मनपाशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, आयुक्तांच्या भेटी घेतल्या; पण फक्त आश्वासनच हाती मिळाले. या संस्थेकडे सुमारे २२ टन निरुपयोगी प्लास्टिक जमा असून, महापालिका कधी उचलते या विवंचनेत ‘एकटी’ संस्था आहेत.मनपा चौकात प्लास्टिक ‘डंपिंग’चा इशाराकराराप्रमाणे निरुपयोगी प्लास्टिक महापालिकेने उचलणे बंधनकारक असताना त्याकडे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे; पण आता हा विषय आमच्या आवाक्याबाहेर जात असून, महापालिकेने ते आठवड्यात न उचलल्यास सर्व २२ टन निरुपयोगी प्लास्टिक डंपरमध्ये भरून ते महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात आणून टाकण्याचा इशारा ‘एकटी’ संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी दिला आहे.....पण महापालिका जागा देत नाहीहे प्लास्टिक शास्त्रोक्त पद्धतीने कापून ते रस्त्याच्या कामात वापरले जाते. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेडिंग मशीन देण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मनपा पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक उत्सुक नाहीत.निरुपयोगी प्लास्टिक रक्षणासाठी पहारेकरीमहाडिक वसाहतीमध्ये शेडमध्ये असलेले हे निरुपयोगी प्लास्टिक आता वाढून शेडबाहेर रस्त्यावर आले. परिसरातील लोकांतून ओरड होऊ लागली आहे. कोणीतरी रागात ते पेटविण्याची शक्यता असल्याने हे निरुपयोगी प्लास्टिक रक्षणासाठी आता ‘एकटी’ संस्थेला पहारेकरी ठेवण्याची वेळ आली आहे.