शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बिदालमध्ये दिवसात २१० बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 23:45 IST

‘लिम्का बुक’कडून दखल : दुष्काळाविरोधातील लढ्यात २,४७५ जणांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून माण तालुक्यातील जनता एकवटली आहे. त्यातूनच रविवारी २,४७५ लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) बांधले. या श्रमदानाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने दखल घेतली असून, त्यांनी या श्रमदानाची माहितीही मागविली आहे.बिदाल गावाने ‘वॉटर कप’ जिंकण्याबरोबरच पाणीदार गाव करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. ग्रामस्थांनी एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) श्रमदानातून बांधून नवा अध्याय रचला आहे. प्रत्येक लूज बोल्डरसाठी दहा लोक व एक दगड जुळणारा एक अनुभवी कारागीर असे नियोजन केले होते. ठरलेल्या वेळेला ग्रामस्थांबरोबरच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, फलटण येथील ‘आयडीएल’च्या संस्थापिका वैशाली शिंदे यांचा ४५ जणांचा ग्रुप, माण मेडिकल डॉक्टर, वाघजाई गणेश मंडळ, वडगाव, खांडेवस्ती येथील ग्रामस्थांनीही उपस्थिती लावली होती.1‘वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत माण तालुक्यातील ३२ गावांमध्ये कामे सुरू असून, या गावांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. बिदाल ग्रामस्थांनी एकी दाखवीत पावसाचे पडणारे पाणी मुरविण्यासाठी बंधारे बांधण्यासाठी नियोजन केले आहे. ग्रामस्थ दररोज सकाळी सहा वाजल्यापासून श्रमदानासाठी कामाच्या ठिकाणी पायी तसेच वाहनांनी येतात. त्यांच्या पिण्याचे पाणी व सरबताचीही सोय ग्रामस्थांतर्फे केली जाते.2गावाला जैन फाउंडेशनने एक, शासनाचे दोन, शेखर गोरेंचे एक जेसीबी मशीन मोफत, तर अंकुश गोरे यांनी डिझेलवर एक मशीन पोकलेन दिली. तसेच ग्रामस्थांनी दोन पोकलेन, सहा जेसीबी भाड्याने घेतल्या आहेत. त्यातूनच रविवारच्या श्रमदानातून एका दिवसात २१० लहान बंधारे (लूज बोल्डर) बांधण्यात यश आले आहे.