कडगाव : पाटगाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या मौनी सागर जलाशयातील पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत पाटगाव परिसरात २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात आतापर्यंत ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही अंशी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पाटगाव मध्यम प्रकल्पातून वीज निर्मितीसाठी २२५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मौनी सागर जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत ११ % पाणीसाठा जास्त आहे. आज अखेर धरण परिसरात सुमारे एक हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
फोटो -पाटगाव मध्यम प्रकल्प