येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ही बैठक पार पडली. यावेळी तनवडी ग्रामपंचायतीने सेवानिवृत्त कर्मचारी बाळू कदम यांचा गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष दिलीप परीट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार झाला. कांबळे म्हणाले, १० ऑगस्ट २०२० रोजी राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनश्रेणीचा सुधारित अद्यादेश काढला. परंतु, आर्थिक तरतुदीअभावी त्याचा अद्याप लाभ मिळत नाही. यासाठीचा हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
सचिव जगन्नाथ ऊर्फ बापू चिंदके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दिलीप परीट यांनी आभार मानले. बैठकीस संघटक कृष्णा कांबळे, खजिनदार रावजी कांबळे, सरचिटणीस सुरेश म्हंकावे, सुरेश मायन्नावर, शिवाजी शिंदे, रामा घळगी, रामा कांबळे आदींसह गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेकडे तक्रार करा
स्थानिक पातळीवर दाद मागूनही अन्याय दूर होत नसेल तर ग्रामपंचायत कामगारांनी न घाबरता संघटनेकडे तक्रार करावी. वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून संबंधित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करेल, अशी ग्वाही जिल्हा उपाध्यक्ष कॉ. रवींद्र कांबळे यांनी यावेळी दिली.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे ग्रामपंचायत कामगारांच्या बैठकीत तनवडीचे सेवानिवृत्त कर्मचारी बाळू कदम यांचा दिलीप परीट यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी कॉ. रवींद्र कांबळे, सुरेश म्हंकावे, जगन्नाथ चिंदके आदींसह कामगार उपस्थित होते.
क्रमांक : २००७२०२१-गड-१३