शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

शहरात २० ‘वॉटर एटीएम’

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

स्थायी सभेत निविदा मंजूर : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्यांची बदली होणार

 कोल्हापूर : शहरात २० ठिकाणी एक रुपयात स्वच्छ एक लिटर पाणी देणारी ‘वॉटर एटीएम मशीन’ बसविण्यात येणार आहेत. ‘अ‍ॅक्वाक्रॉप्ट’ कंपनीतर्फे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून मिळणाऱ्या एक रुपयातून कंपनी सर्व खर्च पाहणार आहे. महापालिका फक्त जागा व पाणीपुरवठा करणार आहे. या योजनेस गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तसेच शहरातील पाणीपुरवठा विभागाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती आदिल फरास होते. पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागातील उपसा करणारी यंत्रणा जुनी असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्ची पडते. उपसा केंद्रातील मशिनरींचे ऊर्जा परीक्षण करण्याचा निर्णय स्थायी बैठकीत घेण्यात आला. खासगी कंपनीद्वारे हे परीक्षण करण्यात येणार असून त्यानंतर कंपनीद्वारे नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. नवीन यंत्रणेनंतर होणाऱ्या वीज बचतीच्या पैशांतून सर्व खर्च भागविला जाणार आहे. या योजनेस स्थायी समितीने मंजुरी दिली. वॉटर एटीएम मशीन व ऊर्जा परीक्षणानंतर कार्यान्वित होणाऱ्या यंत्रणेचा महापालिकेवर एक रुपयांचा बोजा पडणार नाही. उलट शहरवासीयांना एक रुपयात शुद्ध पाणी मिळेल, असे आदिल फरास यांनी सांगितले. महापालिकेच्या विविध विभागांत अनेक कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्यांची इतरत्र बदली करून इतर विभागही सक्षम करावेत, ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदलीचा ठराव बैठकीत झाला.