शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भय्या मानेंसह २० जणांवर गुन्हा

By admin | Updated: September 18, 2016 00:38 IST

नायब तहसीलदारांची तक्रार : कागलच्या तहसीलदार कार्यालयात दंगा केल्याचा आरोप

कागल : तहसीलदार कार्यालयात तहसीलदार आणि तलाठ्यांची बैठक सुरू असताना तेथे दंगा करून शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राष्ट्रवादीच्या कागल शहरातील २० कार्यकर्त्यांवर शनिवारी दाखल झाला. नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांनी ही तक्रार दिली आहे. जिल्हा बँकेचे संचालक भय्यासाहेब माने, नगरसेवक प्रवीण गुरव, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, सुनील कदम, प्रवीण काळबर, सतीश गाडीवड्ड, योगेश चौगुले, संग्राम सणगर, विवेक लोटे, पप्पू कुंभार, गणेश सोनुले, युवराज माळी, राहुल गाडेकर, राकेश वाघमारे, प्रशांत जाधव, सचिन सोनुले, बच्चन सोनुले, प्रवीण दावणे, अनिल शिंगाडे, प्रशांत हेगडे (सर्व रा. कागल) यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, तहसीलदारांच्या केबिनमध्ये सकाळी १०.३० वाजता २९ तलाठी आणि ६ मंडल अधिकाऱ्यांची शासकीय बैठक सुरू होती. त्यावेळी भय्या माने या ठिकाणी आले. तहसीलदारांनी तुमच्याशी एक तासांनी बोलतो, असे म्हटल्यावर ते परत गेले. त्यानंतर १२.३० वाजता २० हून अधिक कार्यकर्ते घेऊन आले. बैठकीत घुसून तहसीलदारांशी उद्धट वर्तन करीत शिवीगाळ केली. प्रवीण गुरव यांनी बघून घेण्याची धमकी दिली. निराधार योजनेच्या पेन्शनचे पैसे चुकीच्या पद्धतीने वाटले जात आहेत, असे म्हणत एका खासगी कर्मचाऱ्यास मारहाण केली. (प्रतिनिधी)न्याय कोणाकडे मागायचा : भय्या माने दरम्यान, प्रताप ऊर्फ भय्या माने यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून त्यामध्ये म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शनची रक्कम चुकीच्या पद्धतीने लोकांच्या घरात जाऊन देण्याचा प्रकार कागलमध्ये सुरू होता. तो तहसीलदारांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली आहे. जाणीवपूर्वक आम्हाला ‘टार्गेट’ केले आहे. याबद्दल आम्ही योग्य ठिकाणी न्याय मागणार आहोत. यापूर्वी केलेल्या तक्रारीची दखल तहसीलदारांनी घेतलेली नाही. तहसीलदारच अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?