शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

करंजफेन, सावर्डीमध्ये २० घरे झाली जमीनदोस्त; रात्रीत घुसले पुराचे पाणी घरात : दावी कापून जनावरे सोडून दिल्याने वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

अणूस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन, सावर्डी येथे अस्मानी पावसाने वीस घरे जमीनदोस्त झाली असून, दोन म्हशी मातीत गडप ...

अणूस्कुरा : शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन, सावर्डी येथे अस्मानी पावसाने वीस घरे जमीनदोस्त झाली असून, दोन म्हशी मातीत गडप झाल्या आहेत. डोंगर खचल्याने सावर्डी-करंजफेन हा मार्ग बंद झाला आहे. लोकांसमोर पोटाला खायचे काय असा प्रश्न तयार झाला आहे.

कासारी नदीच्या महापुराचे पाणी २२ जुलैला घरात शिरल्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन येथे आठ व सावर्डी येथील बारा अशी एकूण वीस घरे पूर्णपणे पडून जमीनदोस्त झाल्याने सुमारे ६० लोक बेघर झाले आहेत, त्याच रात्री सावर्डी, करंजफेन मार्गावर पाच ठिकाणी डोंगर खचल्याने हा रस्ता बंद झाला. त्यामुळे सावर्डी व इजोली या गावांचा अद्याप संपर्क तुटला आहे. मध्यरात्री पुराचे पाणी घरात शिरल्याने लोकांची एकच धांदल उडाली. रात्रीच्या वेळी काय करावे हेच सुचेना, गोठ्यातील जनावरांची दावी कापून वाट मोकळी केली त्यामुळे पंचवीस जनावरे डोंगराकडे हाकलून त्यांचा जीव वाचवण्यात यश आले,परंतु सावर्डी येथील बाळू कोकरे यांच्या दोन म्हशी गोठ्यातच अडकल्या,त्यांच्या अंगावर दगड,माती, लाकूड, सामान पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. करंजफेनमधील बाळू शंकर कांबळे , रंगराव लक्ष्मण कांबळे, राजाराम लक्ष्मण कांबळे, संतू लक्ष्‍मण कांबळे, प्रदीप फाटक, मानसिंग पाटील, नानूबाई कांबळे, अमीन शेख, अल्ताफ शेख, मोजेम शेख यांची घरे उद्‌ध्वस्त झाल्यामुळे दुसऱ्याच्या घरात आसरा घ्यावा लागला. सावर्डी येथील धोंडिराम बाळू राठोड, पांडुरंग सकपाळ, कृष्णा पाडावे, बंडू रामा पाडावे, चंद्रकांत कोंडिबा पाडावे, राजाराम नारायण पाटील,तुकाराम सदाशिव जाधव, तुकाराम धोंडिराम कांबळे, बाळू महादू कोकरे यांना गावातील प्राथमिक शाळेत संसार मांडावा लागला आहे.

सव्वाशे पोती धान्य मातीत

घरातली एकही वस्तू न घेता अंगावरील कपड्यानिशी घर सोडून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावे लागले, प्रत्येक कुटुंबाची शेती हेच उत्पन्नाचे साधन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे मिळून साधारणपणे सव्वाशे पोती धान्य मातीत गाडले गेले त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या घरांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून शासकीय मदत व सामाजिक संस्थांनी हातभार लावून या कुटुंबांचे संसार उभे करण्याची गरज आहे.

फोटो ३१०७२०२१-कोल-धान्य

शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी येथील धोंडिराम ऱ्हाटवड यांचे घर जमीनदोस्त होऊन सुमारे चाळीस पोती धान्य त्याखाली गाडले गेले.