शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिरवे कुटुंबीयांकडून २० मुली शिक्षणासाठी दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : ‘लेक वाचवा देश वाचवा’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अशा घोषणा सरकारी यंत्रणेपासून ते सामाजिक व स्वयंसेवा संस्थांच्या कार्यक्रमात ऐकू येतात; पण मुलगीबाबत जनजागृतीचे फलक न उभारता स्त्री जन्माचे स्वागत करून तिच्या नामकरण समारंभाचा थाटमाट न करता त्या दिवशी तब्बल २० मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा ...

लोकमत न्यूज नेटवर्कदेवाळे : ‘लेक वाचवा देश वाचवा’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अशा घोषणा सरकारी यंत्रणेपासून ते सामाजिक व स्वयंसेवा संस्थांच्या कार्यक्रमात ऐकू येतात; पण मुलगीबाबत जनजागृतीचे फलक न उभारता स्त्री जन्माचे स्वागत करून तिच्या नामकरण समारंभाचा थाटमाट न करता त्या दिवशी तब्बल २० मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.पैजारवाडी गावचे उपसरपंच उमेश ऊर्फ सागर हिरवे हे आपले आजोबा शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे (गुरुजी) यांच्या विचारांचा वारसा घेऊन नातू उमेश हिरवे यांनी हिरवे गुरुजींच्या समाजकार्याचा वसा पुढे चालवत दीपाली यांच्या पोटी जन्मलेल्या मुलीचे मोठ्या आनंदाने स्वागत करून नामकरण कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता पैजारवाडी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पेन- वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये शिकत असलेल्या २० मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन खºया आर्थने स्त्री जन्माचे स्वागत केल्याने कौतुकाची बाब होत आहे.पं.पु. चिले महाराजांचे परमभक्त ओम चैतन्य गुरुमाउली यांनी मुलीचे नामकरण करून आशीर्वाद दिला. या नामकरण कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांनी हिरवे दाम्पत्याचे कौतुक केले. वंशाला मुलगाच पाहिजे, अशी मानसिकता बाळगणाºयांच्या डोळ्यांत या परिवाराने झणझणीत अंजन घातले आहे. मुलगा-मुलगी एकसमान मानून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात जनजागृती होऊन समाजप्रबोधन होईल, असे मत व्यक्त केले. बी. के. घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सरपंच दीपाली साठे, अनिल कामिरे, सागर हिरवे, चंद्रशेखर तांदळे, रणखंबे, मुख्याध्यापक विवेक देशपांडे, सर्व अध्यापक, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.