शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी २ लाख ६७ हजार अर्ज--अर्ज भरण्याची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:35 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता.

ठळक मुद्देसुमारे ५० हजार शेतकºयांनी अर्ज भरलेच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’त जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले. अर्ज भरण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. साधारणत: जिल्ह्यातून सव्वातीन लाख शेतकरी अर्ज दाखल करतील, असा सहकार विभागाचा अंदाज होता.राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी २४ जुलैपासून आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यासाठी सहकार विभागाने महा-ई सेवा केंद्रांसह जिल्ह्यात एक हजार केंद्रांमध्ये सोय केली होती. गेले पावणेदोन महिने शेतकºयांनी या माध्यमातून अर्ज दाखल केले आहेत. राज्य सरकारने २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.जिल्हा बॅँक व राष्टÑीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून शेतकरी पीककर्जाची उचल करतात. सरकारने जाहीर केलेल्या निकषांत बसणाºया शेतकºयांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार असल्याने, पात्र शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन सहकार विभागाने केले होते. साधारणत: थकीत कर्जदार व नियमित परतफेड करणाºया शेतकºयांची संख्या पाहिली तर जिल्ह्णात ३ लाख १७ हजार होते. एवढे आॅनलाईन अर्ज येतील, असे सहकार विभागाला अपेक्षित होते; पण गेल्या पावणेदोन महिन्यांत २ लाख ६७ हजार शेतकºयांनी अर्ज दाखल केले आहेत. साधारणत: ५० हजार शेतकरी अर्ज दाखल करू शकले नाहीत.सदाभाऊ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणारआॅनलाईन अर्ज भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, या मागणीचा ठराव कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी(दि. २१) रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्यात केला होता. या ठरावासह मुख्यमंत्री फडणवीस यांची ते २६ रोजी भेट घेणार आहेत.मुश्रीफ आज पालकमंत्र्यांची भेट घेणारनियमित कर्जाची परतफेड करणाºयांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी सलग दोन वर्षांच्या कर्जाची जुलै २०१७ पर्यंत परतफेड करणे बंधनकारक होते. यामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरणार आहेत. याबाबत आमदार हसन मुश्रीफ हे आज, शनिवारी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेणार आहेत.आॅनलाईन अर्जांची माहिती जिल्हा बॅँकेने १ ते ६६ नमुन्यांत अद्ययावत करावयाची आहे. त्यानंतर लेखापरीक्षक तपासणी करणार आहेत. आतापर्यंत २८ विकास संस्थांतर्गत २ हजार ५६९ खात्यांची तपासणी केली आहे.