शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेसाठी १९ लाखांचा निधी

By admin | Updated: September 17, 2016 23:58 IST

दत्तात्रय शिंदे : ३१७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार; जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी

सांगली : जिल्ह्यात ‘नो डॉल्बी’ची मोहीम यशस्वी झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिस व प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’ न लावता यावर होणारा सुमारे १९ लाखांचा निधी ‘जलयुक्त शिवार’ला दिला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ही तर सुरुवात आहे. यापुढे कोणताही उत्सव असो अथवा समारंभ ‘डॉल्बी’ लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तातडीने कारवाई झालेली दिसेल, असेही त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, गणेशोत्सव सुरु करण्याचा लोकमान्य टिळक यांचा मूळ उद्देश हा समाजप्रबोधन करणे हा होता. त्याअनुषंगाने ध्वनी प्रदूषणाला बाजूला करीत समाजाच्या विकासाची सकारात्मक व विधायक कामे गणेश मंडळांनी हाती घेणे आवश्यक होते. शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरुपी सोडविणाऱ्या जलयुक्त शिवारास मदत करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. पोलिस ठाणे स्तरावर २२८ बैठका घेण्यात आल्या. पोलिस उपअधीक्षकांनी २५, विशेष पोलिस महानिरीक्षक व मी स्वत: एक अशा एकूण २२८ वेळा गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ३१७ मंडळांनी आतापर्यंत १८ लाख ५३ हजार ६०२ रुपयांची निधी दिला आहे. अजूनही काही मंडळांकडून मदतीचा ओघ सुरुच आहे. प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच दुष्काळी भागात सिमेंट बंधारे बांधण्याचे काम सुरु होईल. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी ४ हजार ६६० मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. सव्वालाख घरगुती मूर्र्तींची प्रतिष्ठापना झाली. उत्सव सुरु होण्यापूर्वीच १३६९ मंडळांनी ‘डॉल्बी’ लावणार नाही, असे लेखी अभिवचन दिले होते. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच ‘डॉल्बी’शिवाय गणेशोत्सव साजरा झाला. गणेश मंडळांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. उत्सवाच्या माध्यमातून सुरु झालेली विधायक कामाची ही चळवळ यापुढेच अशीच सुरु ठेवली जाईल. उत्सव काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेकॉर्डवरील पाच हजार गुन्हेगारांवर कारवाई केली. दोन हजारहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यामुळे कुठेही तणाव निर्माण झाला नाही. मिरवणुकीत दारू पिऊन नृत्य करण्याचे प्रकारही कुठे घडले नाहीत. याच काळात बकरी ईद होती. तीही शांततेत पार पडली. चांगल्याप्रकारे उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांना पोलिस ठाणे तसेच जिल्हा स्तरावर रोख बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे. (प्रतिनिधी) ‘डॉल्बी’मुक्तीतून ‘जलयुक्त शिवाराकडे’ अशी हाक दिली. गावोगावी बैठका घेतल्या. प्रसारमाध्यमांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे लोकांमध्ये तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास न जनजागृती निर्माण झाली. याचे फलित म्हणूनच ‘डॉल्बी’शिवाय उत्सव साजरा झाला आणि ‘जलयुक्त शिवाराचे’ विधायक काम मार्गी लागत आहे. - दत्तात्रय शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे म्हणाले, गणेशोत्सवात जिल्ह्यात १९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ‘डॉल्बी’ लावण्याचा प्रयत्न केल्याचे सहा गुन्हे नोंद केले. मिरवणुकीत स्पिकर परवाना घेतला नाही, मिरवणूक संपवून येताना अपघातात गणेशभक्ताचा मृत्यू, प्रसाद घेण्यास दरवाजातून जाण्याच्या कारणावरुन मारामारी, मिरवणुकीत धक्का लागल्याचा जाब विचारल्यावरुन मारामारी व मिरवणुकीत डॉल्बी साहित्याचा वापर केल्याप्रकरणी असे प्रत्येक एक गुन्हे तसेच अचानक मिरवणूक मार्गात बदल केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहेत.