शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा केंद्रातील १९ लाख मत्स्यबीज गेले वाहून; महापुराचा तडाखा : मत्स्य व्यावसायिक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, पण त्याचा परिणाम तलावाशेजारी असणाऱ्या मत्स्यबीज केंद्राला बसला आहे. त्यात ...

कोल्हापूर : शहरात पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, पण त्याचा परिणाम तलावाशेजारी असणाऱ्या मत्स्यबीज केंद्राला बसला आहे. त्यात सोडण्यात आलेल्या १९ लाख मत्स्य जिरे (बीज) रंकाळा तलावात वाहून गेले, परिणामी जिल्ह्यातील मत्स्यशेती करणारे शेतकरी, लहान-मोठे तलाव यांना मत्स्यबीजाचा तुटवडा जाणवणार आहे.

जिल्ह्यातील लहान-मोठे तलावांना प्रतिवर्षी रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज पुरवठा केला जातो. तसेच जवळपास १२५ शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही इथूनच बीजपुरवठा केला जात होता. यंदा बीजच वाहून गेल्याने शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या तलावांना मत्स्यबीज तुटवडा भासणार आहे. याचा परिणाम शेतकरी, कोळी, मत्स्य व्यावसायिक यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाकडून गेल्या ६ वर्षांपासून रंकाळा मत्स्यबीज केंद्रातून बीज निर्मिती प्रक्रिया बंद होती. खासगी मत्स्यबीज विक्रेत्यांकडून जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना बीज पुरवठ्यासाठी मदत केली जात होती. यंदा नव्याने रंकाळा मत्स्यबीज केंद्रात बीज निर्मितीचा प्रयत्न केला होता; पण पडलेल्या प्रचंड पावसाने रंकाळा ओव्हरफ्लो झाला, परिणामी ६ बीज प्रक्रिया तळी (लगून) मध्ये पाणी साम डोम भरल्याने जवळपास सर्वच बीज रंकाळा तलावामध्ये वाहून गेले.

मत्स्य व्यवसाय विभागाची अनास्था

विभागीय मत्स्य व्यवसाय विभागामध्ये विभागीय आयुक्त हे पद २००८ पासून प्रभारी आहे. तसेच या विभागातील प्रत्यक्ष रंकाळा मत्स्य केंद्रामध्ये काम करणारे क्षेत्रीकची ३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मत्स्य व्यवसायाकडे कल वाढत चाललेला असतानासुद्धा येथे कायमस्वरूपी विभागीय आयुक्त व इतर रिक्त पदे भरण्याची गरज होती; पण शासनाच्या अनास्थेमुळे या विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

प्रतिक्रिया.....

प्रत्येकवर्षी ऑगस्ट महिन्यात खासगी किंवा सरकारी बीज उपलब्ध होत होते. यावर्षी पुराने बीज वाहून गेल्याने खासगी विक्रेत्यांकडून चढ्या दराने बीज विकत घ्यावे लागणार आहे. महापुराने इतर पिके वाया गेली आहेतच शिवाय मत्स्य शेती तोट्यात येणार आहे.

आनंदा पाटील,

कोथळी (ता. करवीर) मत्स्य शेतकरी

यावर्षी रंकाळा तलाव पूर्ण भरल्याने शेजारील मत्स्य तळ्यातील बीज तलावात वाहून गेले आहे. जिल्ह्यातील तलाव व शेतकऱ्यांना इतर शासकीय किंवा खासगी बीज उपलब्धतेसाठी मार्गदर्शन केले जाईल.

सतीश खाडे,

प्रभारी सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय