\कोल्हापूर : रहदारीस अडथळा होईल असे वाहन लावणे, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणे, मोबाईलचा वापर, दोनपेक्षा अधिक इसम वाहनावरून नेणे, अशा विविध प्रकारच्या कारवाया शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केल्या. १ जानेवारी ते ३० जूनअखेर गेल्या सहा महिन्यांत एकूण १८ हजार २०९ खटल्यांमधून शासनाच्या तिजोरीत १९ लाख १५ हजार ९०० रुपये जमा दंडात्मक कारवाईमधून जमा झाले आहेत. रहदारीस अडथळा होईल अशा सर्वाधिक ८९०७ खटल्यांमधून ९ लाख ९२ हजार ५०० रुपये दंडात्मक महसूल तर मुंबई पोलीस कायद्यानुसार केलेल्या तीन खटल्यांमधून ५०० रुपये दंडात्मक महसूल मिळाला. दरम्यान, १ ते ९ जुलै या कालावधीत ३९५ खटले दाखल करण्यात आले. त्यामधून ३९ हजार ५०० रुपये दंडात्मक महसूल मिळाला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी गेल्या अडीच वर्षांत कडक कारवाईचे प्रमाण वाढविले. १ जानेवारी ते ३० जून २०१५ कालावधीत १८ हजार २०९ खटले दाखल केले. त्यामध्ये वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, विना नंबरप्लेट, सिग्नल जंप करणे, ड्रायव्हिंगला अडथळा होईल असे प्रवासी वाहून नेणे, वाहनास काच गडद किंवा फिल्मिंग काच लावणे, प्रमाणापेक्षा जादा विद्यार्थी वाहतूक करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, इतर खटले, मद्यपान करून वाहन चालविणे अशाप्रकारच्या कारवाई करण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांत शहरात सिग्नलची संख्या वाढली पण, कारवाईची संख्याही वाढली आहे.दीड वर्षांचा आढावा१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ - (५५ हजार ७४९ खटले), दंड ५४ लाख ९२ हजार २०० रुपये १ जानेवारी ते ९ जुलै २०१५ -(१८ हजार २०९ खटले), दंड १९ लाख १५ हजार ९०० रुपयेजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शहरात कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी सहा कारवाया केल्या.- आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर.
१९ लाख १५ हजारांचा दंड शासनाच्या तिजोरीत
By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST