शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रिडाई कोल्हापूर’साठी १९ अर्ज दाखल

By admin | Updated: May 13, 2017 16:49 IST

रविवार अखेरचा दिवस : १७ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १३ : ‘क्रिडाई कोल्हापूर’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेची २०१७-२०१९ साठीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. २१ मे रोजी ही निवडणूक होत आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. रविवारीही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. विवेक घाटगे हे काम पाहत आहेत. ‘क्रिडाई कोल्हापूर’ संघटनेच्या एकूण १७ संचालक पदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. संघटनेची १२७ सभासद संख्या आहे. संघटनेची गतवेळची निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदाही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्येष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत; पण यंदाही या संघटनेवर संचालक म्हणून जाण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी १९ उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर रविवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

उमेदवारी अर्जांची छाननीची प्रक्रिया सोमवारी सकाळी अकरा वाजता होईल. त्यानंतर दुपारी दोन वाजता ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या कार्यालयात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मंगळवारी (दि. १६) दुपारी दोन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे. यादिवशी सायंकाळी पाच वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २१ मे (रविवारी) रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या कार्यालयात मतदान होणार आहे. दुपारी तीन वाजता मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल. निवडून आलेल्या १७ संचालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी यांची निवड करण्यात येणार आहे.