शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित जिल्ह्यात ४८ तासांत १८४ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत नसून ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत नसून ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी संध्याकाळी संपलेल्या ४८ तासांमध्ये जिल्ह्यात नवे १८४ रुग्ण आढळले असून, यातील सर्वाधिक रुग्ण नेहमीप्रमाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ही संख्या ९९ इतकी आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराकडे प्रशासन नियम अधिक कडक करण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांत आजरा तालुक्यात चार, भुदरगड तीन, गडहिंग्लज तीन, हातकणंगले अकरा, करवीर वीस, पन्हाळा चार, शाहूवाडी एक, शिरोळ एक, नगरपालिका क्षेत्रामध्ये सोळा आणि इतर जिल्ह्यांतील २१ अशा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दोन दिवसांमध्ये ४६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १९०५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. २४३ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ७७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांमध्ये १२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

येलूर, जि. सांगली येथील ४९ वर्षीय महिलेचा, इचलकरंजी येथील आवळे गल्लीतील ७४ वर्षांच्या पुरुषाचा तर प्रतिभानगरमधील एसबीआय काॅलनीतील ७५ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस रोज सरासरी ७५ हून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. सोमवारी, मंगळवारी तर हा आकडा ९० च्यावर गेल्याने काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.

चौकट

पुण्या-मुंबईकडून येणाऱ्यांचे काय?

मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा जर या दोन्ही शहरांतून नागरिक मोठ्या संख्येने गावाकडे येऊ लागले तर याबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

चौकट

आज अधिकाऱ्यांची बैठक शक्य

तीन दिवसांच्या सुटीनंतर जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय कार्यालये आज मंगळवारी पुन्हा सुरू होणार आहेत. मार्चअखेरीमुळे जरी काही कार्यालये सुरू असली तरी त्यामध्ये आर्थिक विषयासाठी ती कार्यरत होती. मात्र, राज्यातील वाढती संख्या, राज्यस्तरावरून दिले जाणारे लाॅकडाऊनचे संकेत यामुळे मंगळवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.