शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अटकेतील ठकसेनाकडून औषध विक्रेत्यास १८ लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

कोल्हापूर : हैदराबाद येथून अटक केलेल्या ठकसेनाने आणखी एकास १८ लाखाला गंडा घातल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद झाली. मीर ...

कोल्हापूर : हैदराबाद येथून अटक केलेल्या ठकसेनाने आणखी एकास १८ लाखाला गंडा घातल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांत नोंद झाली. मीर सरफराज अली (वय ४९, रा. चारमिनार, हैदराबाद, राज्य तेलंगणा) असे ठकसेनाचे नाव आहे. सोन्याच्या व्यवहारात पैसे गुंतवा, मोठ्या रकमेचा परतावा देतो, असे आमिष दाखवून त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे उघड होत आहे.

लॉकडाऊनमध्ये पूनम संजय अतिग्रे (रा. मंगळवार पेठ) यांच्या मुलाला नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून मीर सरफराज अली याने १२ लाख रुपये घेतले. त्यांना गोल्ड लोनचे आमिष दाखवून त्यांचे सोने बॅंकेत गहाण ठेवून लोनची रक्कम परस्पर हडप केली. अतिग्रे यांनी जुना राजवाडा पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली होती. त्याने सुधीर कानडे व रामचंद्र म्हेत्तर, विशाल संकपाळ, मोहन चाचे यांनाही लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे चौकशीत पुढे आले. तो सात महिने फरार होता. त्याला पोलिसांनी मंगळवारी (दि. ७) हैदराबाद येेथे अटक केली. सद्या तो पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान, त्या ठकसेनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील किसन तातोबा खंदारे (५२, रा. नागाळा पार्क) याही औषध दुकानदारास १८ लाखाला गंडा घातल्याची तक्रार शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. सोन्याच्या गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे त्याने आमिष दाखविले होते.