शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगासाठी १७०० कोटी : हाळवणकर

By admin | Updated: March 19, 2016 00:28 IST

वस्त्रोद्योगात नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगाबरोबरच जुन्या उद्योगांसाठीसुद्धा व्याज अनुदानाचा लाभ घेता येईल.

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला होणाऱ्या कर्जपुरवठ्यावर व्याजदराची सवलत आणि विजेच्या सवलतीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात १७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. त्यावरील प्रतिक्रिया आमदार हाळवणकर यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, वस्त्रोद्योगासाठी २६५ कोटींच्या तरतुदीपैकी व्याजाच्या अनुदानाकरिता १०० कोटींची तरतूद आहे. वस्त्रोद्योगात नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगाबरोबरच जुन्या उद्योगांसाठीसुद्धा व्याज अनुदानाचा लाभ घेता येईल. यंत्रमागाला सवलतीच्या दराने वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी १६०० कोटी, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी आमदार हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी यापूर्वी शासनाला सादर केल्या होत्या. त्याप्रमाणे केंद्राच्या तांत्रिक उन्नयन (टफ्स) योजनेतील अनुदानाशिवाय नवीन उद्योग घटकांसाठी राज्य सरकारचे २५ ते ३५ टक्के अनुदान एकरकमी मिळणार आहे. रुकडी पुलासाठी ११ कोटींची तरतूदइचलकरंजी ते कोल्हापूर हे अंतर सुमारे दहा किलोमीटरने कमी करण्यासाठी पंचगंगा नदीवर रुकडी येथील पुलाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. या पुलासाठी शासनाने ११ कोटींची तरतूद शुक्रवारच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे गेली आठ वर्षे आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, कोल्हापूरला दररोज जाणाऱ्यांंची वेळ, पैशाची बचत होणार आहे, असे हाळवणकर यांनी स्पष्ट केले आहे.