शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अजून १७ टक्के लोक निरक्षर

By admin | Updated: August 7, 2015 23:58 IST

साक्षरतेचे प्रमाण ८३ टक्के : पुरुष साक्षरतेचे प्रमाण ९१ टक्के, शहरात आठ टक्के लोकांना अक्षरओळख नाही

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  स्वातंत्र्य मिळून सहा दशके होऊन गेली तरीही जिल्ह्यातील १७, तर शहरातील ८ टक्के लोक निरक्षर आहेत. सरासरी जिल्ह्यात ८३ टक्के लोक साक्षर आहेत. आज, शनिवारी साक्षरता दिन आहे. त्यानिमित्त सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर हे चित्र समोर आले. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात, तर सर्वांत कमी कोल्हापूर शहरात निरक्षर आहेत.  गेल्या पिढीत शाळेचे तोंडही न पहिलेल्यांना साक्षर करण्यासाठी जिल्ह्यात सध्या फारसे उपक्रम शिक्षण विभागाकडे नाहीत. दहा वर्षांपूर्वी प्रौढ शिक्षण योजनेतून चाळीशी, पन्नाशीच्या आसपास असणाऱ्यांनाही अक्षर आणि सांख्यिकीचे धडे देण्यात आले; पण अलीकडे ज्या जिल्ह्यात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथेच साक्षर भारत योजनेंतर्गत प्रौढांनाही साक्षर केले जात आहे. जिल्ह्यात महिला साक्षरतेचे प्रमाण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने या योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नाही. त्यामुळे शालेय वयोगटांत शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना अक्षरओळख नसल्यामुळे १७ टक्के अजूनही निरक्षर राहिल्याचे, तज्ज्ञांचे मत आहे. डोंगराळ तालुक्यात आणि दळणवळणाची सुविधा नसलेल्या तालुक्यात निरक्षर लोकांची संख्या जास्त आहे. शहरीकरण वाढलेल्या, सुविधा असलेल्या तालुक्यात साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. दरम्यान, सर्वच घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे शिक्षण विभाग विविध योजना राबवत आहे. प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करीत आहे. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोर केली जात आहे. एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्थलातंरित कुटुंबे जेथे जातील तेथील शाळेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दाखल करून घेतले जात आहे. शिक्षणाबद्दल जाणीव, जागृतीही वाढली आहे.परिणामी जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण वाढते आहे. नोकरी, व्यवसाय यामध्ये महिलांना समान संधी मिळत आहे. त्यामुळे शिक्षणात महिलाही आघाडीवर राहिल्या आहेत. पूर्वी प्रत्येक गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पदवीधर असायचे. आता एका कुटुंबांत अनेकजण पदवीधर होत आहेत, असे सकारात्मक चित्र खेडोपाडीही दिसत आहे; पण शिक्षणाचे वय नाही व इच्छा नाही, अशा १७ टक्के लोकांनाही साक्षर करण्याची योजना असावी, अशी मागणी होत आहे. एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक वर्षी जून महिन्यात शिक्षण विभाग मोहीम राबवत असते. शाळाबाह्य मुलांना शोधून शाळेत दाखल केले जाते. मागास घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. जागृतीही वाढते आहे. यामुळे साक्षरतेचे प्रमाण चांगले वाढते आहे. - सुभाष चौगुले,शिक्षणाधिकारी (प्राथमिक)