शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

किणेत मधमाशांच्या हल्ल्यात १७ जखमी

By admin | Updated: April 8, 2016 00:24 IST

दैव बलवत्तर म्हणूनच..

आजरा : किणे (ता. आजरा) येथे बसस्थानक आवारात तारओहोळ शेजारील झाडावरील मधमाश्यांच्या पोळ्यावर शाळकरी मुलांनी दगड मारल्याने मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात या परिसरातील १७ जण जखमी झाले असून, या हल्ल्यात चार बकऱ्यांसह कुत्रेही गंभीर जखमी झाले आहे.सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अचानक मधमाश्या उठल्या व त्यांनी या परिसरातील खेळणाऱ्या शाळकरी मुलांसह दिसेल त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकाराने ग्रामस्थ भांबावून गेले, तर शाळकरी मुलांची पळापळ सुरू झाली. शाळकरी मुलांनी दिसेल त्या घराचा आधार शोधला. रस्त्यावरील व बसस्थानक परिसरातील गोंधळ पाहून येथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहने जागीच थांबवली.या हल्ल्यात दशरथ केसरकर, संजय मांगले, उषा मांगले, शंकर होलम, विठोबा रेमळे, गोपाळ नाईक, बाबूराव पाटील, सोनम पाटील, आशिष केसरकर, शर्करी गोरे, फिरोज मुल्ला, अविष्कार ससाणे, अनिरुद्ध गोरे, ओंकार मांगले, गायत्री पाटील, आदी १७ जण जखमी झाले. संजय मांगले यांच्या मालकीची चार बकरी व दशरथ गिलबिले यांचे एक कुत्रेदेखील यातून बचावले नाही. बकऱ्यांची दावी ग्रामस्थांनी तोडून त्यांची सुटका केली.नेसरी येथून रुग्णवाहिका मागवून जखमींना नेसरी, वाटंगी व आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. नेसरी ग्रामीण रुग्णालयात डॉ. ए. एस. पाटील, वाय. पी. कोले, भूषण इंगवले, संतोष लोट यांनी रुग्णांवर उपचार केले. (प्रतिनिधी)दैव बलवत्तर म्हणूनच..मधमाश्यांचा हल्ला झाल्यानंतर हल्ल्यात सापडलेले दशरथ केसरकर यांनी जीव वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र, मधमाश्यांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून केसरकर जीव मुठीत घेऊन पाण्याच्या बाहेर आले. तरीही मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला केलाच. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वाटंगी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.