शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘कन्यागत’साठी १७ कोटींचा निधी प्राप्त

By admin | Updated: April 1, 2016 01:27 IST

सैनी यांची माहिती : यंत्रणांनी आराखड्यानुसार कार्यवाहीस प्राधान्य द्यावे

कोल्हापूर : नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाल सन २०१६ च्या आराखड्यातील विविध कामांसाठी पहिल्या टप्प्यात ६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १७ कोटी रुपयांचा निधी ‘बीडीएस’द्वारे जिल्हा नियोजन समितीला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी १२१ कोटी ६४ लाख रुपयांच्या आराखडा मंजूर झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी दिली. विविध विकासकामांसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशी सूचनाही डॉ. सैनी यांनी केली. नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाल २०१६ च्या आराखड्यातील कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. २९) आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सैनी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंके, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, सहाय्यक नियोजन अधिकारी भूषण देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.नृसिंहवाडी येथे आॅगस्ट महिन्यात कन्यागत महापर्वकाळ सोहळा होत आहे. त्यासाठी १२१ कोटी ६४ लाखांच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यातील पहिल्या टप्प्यातील सुमारे ६५ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यातील १७ कोटी रुपयांचा निधी दोनच दिवसांपूर्वी ‘बीडीएस’प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीकडे प्राप्त झाला आहे. उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे. कन्यागत महापर्र्वकालसाठी पहिल्या टप्प्यात करावयाच्या सर्व कामांचे सूक्ष्म नियोजन करून सर्व विभागांनी आपापल्या कृती आराखड्यानुसार कार्यवाही करावी, यामध्ये कसल्याही प्रकारची हयगय करू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकारी सैनी यांनी केली. या बैठकीत कन्यागत महापर्वकाल २०१६ निमित्त बोधचिन्ह, दर्शनमंडप, नदीघाट, भक्तनिवास, रस्ते, पार्किंग, शौचालय व्यवस्था, अंतर्गत गटर्स, लाईट, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्था, दळणवळण सुविधा, आदींबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली, तसेच कन्यागत महापर्वकालसाठी करावयाच्या सर्व कामांचे तसेच उपाययोजनांबाबत सविस्तरपणे आढावाही घेण्यात आला. (प्रतिनिधी)उद्या विविध कार्यक्रम : पालकमंत्री, जलसंधारण राज्यमंत्र्यांची उपस्थिती तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकालानिमित्त उद्या, शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ११.३० वाजता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या दर्शन मंडप कामाचा प्रारंभ होणार आहे. यानंतर सकाळी ११.४५ वाजता कन्यागत महापर्वकालानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण होईल. दुपारी २.१५ वाजता तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बांधकाम विभागातर्फे नियोजित रस्त्याच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. तसेच जलसंधारण विभागातर्फे कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने कृष्णा नदीवर उभारण्यात येणाऱ्या दगडी घाट बांधकामाचा प्रारंभ होणार आहे.