शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

रंकाळा ‘डीपीआर’ करण्यास १६ लाख

By admin | Updated: February 11, 2015 00:15 IST

तज्ज्ञ कंपन्यांना निमंत्रण : शासनाकडून १०० कोटींचा निधी मिळणार

कोल्हापूर : राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. आता दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. रंकाळा संवर्धनासाठी १६ लाख रुपये खर्चून विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ कंपन्यांना महापालिका प्रशासनाने निमंत्रित केले असून आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी या परिसराची पाहणी करून आवश्यक कामांची यादी तयार केली आहे. त्यानुसार डीपीआर तयार करून शासनास सादर केला जाणार आहे.राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांत तांबट कमान ते रंकाळा टॉवर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र सांडपाणी अजूनही थेट रंकाळ्यात मिसळते. केंदाळ काढणे, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हरफ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झालेले नाही. साडेआठ कोटी रुपये खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात तसूभरही फरक पडलेला नाही, याची गंभीर दखल आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतली.दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेज लाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी रोखणे, पाणी शुद्ध राहण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे, रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण करणे, आदींसाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यासाठी डीपीआर तयार केला जाणार आहे. विशेष सभेत चर्चा होणार राजीनाम्याचीचमहापौर तृप्ती माळवी यांनी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देण्यास नकार दिला. मात्र नेते व नगरसेवकांच्या मनधरणीनंतर सोमवारी (दि.१६) होणाऱ्या विशेष सभेत त्यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले. राजीनाम्याचा सोमवारचा मुहूर्त ठरल्याप्रमाणे रंकाळा तलाव सुधारणा व सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेची ‘विशेष सभा’ बोलाविण्यात आली आहे. रंकाळ्याचे निमित्त पुढे करत महापौरांच्या राजीनाम्यासाठी बोलावलेल्या या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. एक सभा झाल्यानंतर दुसरी सभा लगेच घेण्यासाठी चार स्थायी समिती सदस्यांचे शिफारसपत्र आवश्यक असते. ‘स्थायी’ने बोलाविलेल्या सभेसाठी शेवटी महापौरांची मंजुरी मिळाली नाही, तर सभा घेता येत नाही. त्यामुळे राजीमान्यासाठीची सभा बोलाविणे हे सर्वस्वी महापौर तृप्ती माळवी यांच्यावरच अवलंबून होते. त्यामुळे त्या सभा कधी बोलाविणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महापौरांच्या मंजुरीने नगरविकास विभागाने सोमवारी (दि.१६) रंकाळ्याच्या समस्या व निराकरणाचे उपाय यावर चर्चा करण्यासाठी ‘विशेष सभा’ बोलाविण्यात आल्याचे जाहीर केले आहे.रंकाळ्याचे संपूर्ण संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजनेची गरज आहे. दर तीन महिन्यांनी रंकाळ्याला जलपर्णी, जंतुसंसर्ग, पाण्याचा रंग बदलणे, दुर्गंधी, आदी व्याधी जडतात. त्यामुळे राज्यातील अग्रणी पर्यटनस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीनेच डीपीआर तयार करण्यात येणार आहे. - पी. शिवशंकर, आयुक्त लाचप्रकरण व महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा याचा काहीही संबंध नाही. ९ फेब्रुवारीला त्यांची सहा महिन्यांची मुदत संपली आहे. राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाची आहे. ‘आघाडी धर्मा’प्रमाणे राजीनामा द्यावाच लागेल. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्या सोमवारी राजीनामा देतील.- हसन मुश्रीफ, आमदार