शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

ऊस खरेदी कर माफीतून १५१ कोटी

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

कोल्हापूर विभागात फायदा : सहवीज निर्मिती करणारे ११ कारखाने मदतीविना

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरराज्य शासनाने हंगाम २०१३-१४मध्ये गाळप झालेल्या उसाचा खरेदी कर माफ केला आहे. याचा फायदा कोल्हापूर विभागातील २१ साखर कारखान्यांना होणार आहे. यामुळे विभागातील कारखान्यांना तब्बल १५१ कोटी ४७ लाख ९७ हजार रुपये मदत होणार आहे. टनाला १५० रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. सहवीजनिर्मिती प्रकल्पामुळे अकरा कारखान्यांना या करमाफीचा थेट फायदा होणार नाही. साखरेच्या घसरलेल्या दरामुळे यंदा साखर उद्योग अडचणीत आहे. उसाचा उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकरी संघटनांनी तीन हजार प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी केली होती. पण हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेचे दर घसरल्याने हा दर कारखान्यांच्या आवाक्याबाहेर होता. ‘एफ.आर.पी.’ प्रमाणे दर देणे बंधनकारक असल्याने कारखान्यांची गोची झाली होती. दर तर द्यावा लागणार पण पैशाची तरतूद कशी करायची, या पेचात कारखानदार अडकले होते. यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी झाली. दराची कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राची मदत घेतलीच, पण त्याबरोबर कारखान्यांकडून घेण्यात येणारा ऊस खरेदी कर माफ करण्याची तयारीही दर्शविली होती. त्यानुसार राज्य शासनाने हा कर माफ केला आहे. यावर्षी कोल्हापूरचे १ कोटी १५ लाख ५५ हजार १८२, तर सांगलीचे ७२ लाख ५७ हजार ६९४ टन असे विभागाचे १ कोटी ८८ लाख १२ हजार ८७६ टनाचे गाळप झाले आहे. पण कोल्हापूरमधील पंचगंगा, शाहू, वारणा, जवाहर, दत्त-शिरोळ, बिद्री, मंडलिक, कुंभी या आठ व सांगली जिल्ह्यातील विश्वास-शिराळा, क्रांती-कुंडल, सोनहिरा या कारखान्यांचे सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यांकडून ऊस खरेदी कर घेतला जात नसल्याने परत देण्याचा प्रश्न येत नाही. या अकरा कारखान्यांचे गाळप ८७ लाख १४ हजार २२८ टन झाले आहे. त्यामुळे उर्वरित कारखान्यांना ऊस खरेदी करमाफीचा लाभ प्रत्यक्षात होऊ शकतो. म्हणजे १ कोटी ९८ हजार ६४८ टनाला १५१ कोटी ४७ लाख ९७ हजार २०० रुपये खरेदी कर माफ होणार आहे.