अमर हा गडहिंग्लज नगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे मेंदूच्या कर्करोगाने निधन झाले. त्यापाठोपाठ त्याच्या वडिलांचेही आकस्मिक निधन झाले. त्याची आई व आत्या दोघी धुणी-भांडी करून घरखर्च चालवितात.
दरम्यान, अमरला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, ही रक्कम त्याच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यामुळे नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी दानशूर व्यक्ती आणि संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार ही मदत करण्यात आली.
'रवळनाथ'चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते 'अमर'च्या आत्या मालूताई नाईक यांच्याकडे रुपये १५ हजारांची रोख मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, संचालक प्रा. विजय आरबोळे, संचालिका प्राचार्या मीना रिंगणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मायदेव, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड, विशाल रोटे, आदी उपस्थित होते.
------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे 'रवळनाथ'तर्फे एम. एल. चौगुले यांनी अमरच्या आत्या मालूताई नाईक यांच्याकडे आर्थिक मदत सुपुर्द केली. यावेळी वासुदेव मायदेव, मीना रिंगणे, दत्तात्रय मायदेव, विजय आरबोळे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०५२०२१-गड-०२