शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

सभेतील राडाप्रकरणी १५ गुरुजींची कसून चौकशी

By admin | Updated: September 6, 2015 21:47 IST

कोल्हापुरातील प्रकरण : शिक्षण समिती बैठकीत कारवाईचा ठराव

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राड्यात आघाडीवर असलेल्या १५ गुरुजींची कसून चौकशी झाली आहे. विविध प्रसारमाध्यमांकडील फुटेज, छायाचित्रांवरून या १५ राडेबाजारांना शिक्षण विभागाच्या त्रिसदस्यही समितीने शोध घेतला आहे. राड्यातील आणखी गुरुजींचा शोध सुरू आहे. संपूर्ण अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत राड्यातील गुरुजींवर कारवाई करण्याचा ठराव केला आहे. शिक्षक बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण २३ आॅगस्टला सभा आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केली होती. या सभेत सत्तारूढ व विरोधक यांच्यात राडा झाला. यावेळी कपडे फाटेपर्यंत शिक्षकांना मारहाण करण्यात आली. अर्वाच्च शिवीगाळ, खुर्ची, चप्पल यांची फेकाफेकी झाली. कोल्हापूरच्या गुरुजींचा राडा हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. दरम्यान, सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली. पहिल्यांदा समिती राड्याची माहिती घेण्यासाठी बँकेत गेली तेथे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. इतिवृत्ताची प्रत मिळाली नाही. पुन्हा ४ सप्टेंबरला बँकेत जावून चौकशी केली. विविध वृत्तपत्रांत छापून आलेली छायाचित्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून फुटेज यांच्यातील चेहरे शोधून १५ राडा करणाऱ्या गुरुजींना शोधून जबाब नोंदविले आहे. कारवाईच होऊ नये, यासाठी प्रयत्न करणारे राडेबाज गुरूजी चौकशी सुरू झाल्यामुळे सैरभैर झाले आहेत. गुरुजींच्या पुढाऱ्यांकडून जावून चौकशीचा ससेमिरा चुकविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु, जिल्हा परिषद पदाधिकारीही राडा केलेल्या गुरुजींवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे राडा केलेल्या गुरुजी अडचणीत येणार आहेत. (प्रतिनिधी)राडा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर दोषीविरुद्ध कारवाईसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे प्रस्ताव दिला जाईल.- सुभाष चौगुले,प्राथमिक शिक्षणाधिकारी