शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी यांत्रिकीकरणासाठी जिल्ह्याला दीड कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST

कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजनेत निधी तरतुदीसाठीचा शासन आदेश आल्याने सरकारी अनुदानावर शेती सुलभ करणारी यंत्रे घेऊ इच्छिणाऱ्या ...

कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजनेत निधी तरतुदीसाठीचा शासन आदेश आल्याने सरकारी अनुदानावर शेती सुलभ करणारी यंत्रे घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. याअंतर्गत जिल्ह्याला दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेनंतर निधी आल्याने आता नोंदणीचा वेग वाढणार आहे.

या वर्षी पाऊसमान चांगले राहिल्याने शेतीतील कामांची बारमाही सुगी सुरू आहे; पण मजुरांची टंचाई जाणवत असल्याने कृषी अवजारे घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यातही मिनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, औषध फवारणी, कोळपणी, कापणी, भांगलण मशीन, पंप, मनुष्य व बैलचलित अवजारे, प्रक्रिया युनिट‌्स यांची मागणी वाढली आहे. ही अवजारे ४० ते ५० टक्के सवलतीवर दिली जात असल्याने तर ती खरेदी करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.

या योजनेची नोंदणी महाडीबीटी पाेर्टलअंतर्गत पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यभरातील शेतकरी एकाच वेळी यावर मागणी नोंद करू शकतात. यावर्षी हे पोर्टल सुरू झाले, नाेंदणीही सुरू झाली; पण यावर्षी कोरोनामुळे वर्ष संपत आले तरी निधीची तरतूदच झाली नसल्याने या योजनेचे भवितव्य टांगणीला लागले होते. अखेर वर्ष संपण्यास १५ दिवस उरले असताना राज्यभरासाठी ६७ कोटी ६२ लाखांचा निधी शासनाने कृषी विभागाकडे वर्ग केला आहे. यात कोल्हापूरच्या वाट्याला दीड कोटी रुपये आले आहेत. गेल्या सात वर्षांत या योजनेअंतर्गत ४२४० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह विविध कृषी अवजारे खरेदी करून शेतीतील कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

चौकट ०१

असे असते अनुदान

मागासवर्गीय, अल्पभूधारक, महिला या गटासाठी ५० टक्के अनुदान आहे, तर इतर लाभार्थ्यांसाठी ४० टक्के अनुदान या यंत्राच्या खरेदीवर दिले जाते.

चौकट ०२

अशी असते प्रक्रिया

ही अवजारे घेऊ इच्छिणाऱ्यांना सर्वप्रथम राज्य सरकारच्या महाडीबीटी या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. यानंतर प्रस्तावांची छाननी होते. ऑनलाईनच सोडत काढली जाते. यंत्र खरेदी केल्याची संबंधित यंत्रणेकडून तपासणी होते, खरेदीची पावती जमा झाली की कृषी विभागाचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष अनुदान जमा होते.

चौकट ०३

यांत्रिकीकरण योजनेची प्रगती

वर्ष दिलेली यंत्रे

२०१३-१४ ४३५

२०१४-१५ ३९५

२०१५-१६ ५९८

२०१६ -१७ ३५९

२०१७ - १८ १०२५

२०१८-१९ ४२८

२०१९-२० १०००

एकूण ४२४०