शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

...अखेर १४ वर्षांनंतर कागलमध्ये निघाला मोर्चा

By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST

राष्ट्रवादीचे आंदोलन : विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात

जहाँगीर शेख - कागल -- संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींची शासन यंत्रणेमार्फत सुरू असलेली चौकशी त्वरित बंद करावी. या मागणीसाठी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने म्हणजे मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विरोधी पक्षाची भूमिका वटविण्यास सुरूवात केली. तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी किती पात्र आणि किती अपात्र हा विषय महत्त्वाचा असला तरी गेल्या १४ वर्षांनंतर तहसील कार्यालयावर तालुक्यातील एका राजकीय गटाचा असा भव्य मोर्चा या निमित्ताने निघाला.आंदोलने कागलात नेहमीच होतात आणि ही आंदोलने शिवसेना, आरपीआय, डाव्या विचारसरणीच्या संघटनाच करतात. मात्र तालुक्यातील प्रमुख राजकीय गट यापासून चार हात लांब राहिल्याचेच चित्र गेली १४ वर्षे पहावयास मिळाले. याचे कारण स्पष्ट आहे. तालुक्यातील चारही गट या ना त्या माध्यमातून सत्तेशी जुळवून घेत राहिले. त्यासाठी पक्षांतरे केली. सत्ताधारी झाल्याने मोर्चे काढायचा कोणाच्या विरोधात हा प्रश्न तयार झाला. मुश्रीफ गट तर १४ वर्षे सत्तेत होता. आता विरोधी पक्षात असल्याने योजनेतील लाभार्थींची मते तर सर्वच राजकीय गटांना हवीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याचीच भाषा झाली. अपात्र की पात्र यावर चर्चाच झाली नाही. आताही होणारा विरोध पडद्याआडच आहे. चौकशी सुरू आहे शासनयंत्रणेमार्फत.१४ वर्षांपूर्वी वंदूर येथील धनगर समाजाची जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या मुद्यावर तत्कालीन घाटगे गटाने माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. पूर्वी विक्रमसिंह घाटगे, सदाशिवराव मंडलिकांनी एकत्र येत काळम्मावाडी धरणासाठी आणि गैबी बोगद्याला विरोध करण्यासाठी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर आता हा मोर्चा निघाला.