शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१३ हजार जणांनी दिली ‘पोस्टमन’ची परीक्षा

By admin | Updated: March 30, 2015 00:16 IST

शहरातील १४ केंद्रांवर गर्दी : टपाल खात्यातील ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

कोल्हापूर : महाराष्ट्र, गोवा राज्यातील पोस्टमन, मेलगार्डपदांच्या रिक्त ७०० जागांसाठी कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे १३ हजार जणांनी रविवारी परीक्षा दिली. सुटी असून शहरातील १४ परीक्षा केंद्रे गर्दीने फुलून गेली.महाराष्ट्र राज्य डाक कार्यालयातर्फे सरळ भरती अंतर्गत परीक्षा घेण्यात आली. शहरातील शहाजी कॉलेज, न्यू कॉलेज, देशभूषण हायस्कूल, मगदूम हायस्कूल, महावीर महाविद्यालय, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, विवेकानंद कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज, केआयटी अशा १४ केंद्रांवर परीक्षा झाली. दुपारी दोन ते चार वेळेत पेपर झाला. सामान्यज्ञान, गणित, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषा विषयांवरील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी शंभर प्रश्न पेपरमध्ये होते. पेपर हे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे सेट करण्यात आले होते. त्यातील बहुतांश प्रश्न दहावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. दरम्यान, पेपरसाठी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर उमेदवार येऊ लागले. काहीवेळातच केंद्र गर्दीने फुलून गेले. केआयटी येथील केंद्रासाठी केएमटीने चार जादा बसेसची व्यवस्था केली होती. भारतीय डाक विभागाने नेमलेल्या एका खासगी संस्थेकडून ही परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर डाक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परीक्षा, व्यवस्थापनाचे काम केले. दि. ४ एप्रिलला मल्टी टासकिंग स्फाट (एमटीएस) पदासाठी परीक्षा होणार आहे. (प्रतिनिधी)एक बेंच, दोन उमेदवारया परीक्षेवेळी काही केंद्रांमध्ये एकाच बेंचवर दोन उमेदवारांना बसविण्यात आले होते. त्याबाबत पेपर सुटल्यानंतर अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. यावर परीक्षेचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेने उमेदवार असे एकाच बेंचवर बसविले असले, तरी त्यांच्या पेपरचे स्वरूप वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले.