शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

१३ थकबाकीदारांसाठी वसुली मोहीम

By admin | Updated: February 26, 2016 00:28 IST

जिल्हा बँक : ‘वसंतदादा’सह जिल्ह्यात अन्य मोठ्या संस्थांचा समावेश

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील बड्या १३ थकबाकीदार संस्थांकडून थकित रकमेची वसुली करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोहीम हाती घेतली आहे. बिगरशेती संस्थांची एकूण थकबाकी १६0 कोटींवर गेल्याने बँकेला एनपीएमधून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही वसुली करावी लागणार आहे. सांगली जिल्हा बँकेने ३९ थकित संस्थांची यादी तयार केली असून त्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना या यादीत क्रमांक एकवर आहे. कारखान्याची सर्वाधिक म्हणजे १0२ कोटी २ लाख ८५ हजार रुपये थकबाकी आहे. वारंवार सूचना देऊनही कारखान्याने प्रतिसाद न दिल्याने बँकेने कारखान्यास सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत नोटीस बजावली आहे. येत्या ६0 दिवसात जर कारखान्याने पैसे भरून खाते नियमित केले नाही, तर कारखान्याची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारखान्याला कोणत्याही परिस्थितीत आता ही रक्कम भरावी लागणार आहे. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील ३९ टॉप थकबाकीदारांची यादी काढून वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये कोटीहून अधिक थकबाकी असणाऱ्या १३ संस्था आहेत. त्यामुळे वसंतदादा कारखान्यासह या १३ संस्थांच्या थकबाकी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. यातील काही संस्था पूर्णत: बंद आहेत, तर काहींच्या वसुलीबाबतची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यातील काहींच्या जुन्या थकबाकी वसुलीसाठी सामोपचार परतफेड योजनेचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्यामुळे येत्या मार्चअखेर बँकेने यातील ९0 टक्के वसुलीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आकस नव्हे, बँकेशी बांधिलकी कारवाईबाबत बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले की, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला दिलेली नोटीस राजकीय आकसापोटी नसून, बँकेशी आमची बांधिलकी असल्याने दिली आहे. बँक अधिकाधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचदृष्टीने आम्ही अनेक थकबाकीदार संस्थांकडून वसुलीसाठी प्रयत्न चालविले आहेत. वसंतदादा कारखाना टिकावा, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, अशी आमचीही इच्छा आहे. त्यांनी कर्जाचे खाते नियमित केले, तर बँक त्यांना पुन्हा कर्ज देऊ शकते. वसंतदादा कारखान्याने स्वत: टप्प्या-टप्प्याने पैसे भरण्याचे लेखी लिहून दिले होते. त्यांनीच त्यांचा शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आम्हाला सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. वसंतदादा कारखान्याला दिलेली कर्जे कर्ज प्रकार मुदत मंजूर कर्ज थकित रक्कम माल ताबे गहाण ३१-१२-१४ ७ कोटी ५,२६,९६,000 नजरगहाण ३१-१२-१४ २ कोटी १,९९,६६,000 अल्पमुदत कर्ज ३१-३-१५ १५ कोटी १५ कोटी सुधारित पुनर्बांधणी ३१-३-२0 ४३ कोटी ४१ लाख ३,६७,00,000 मध्यम मुदत कर्ज ३0-४-१७ २५ कोटी १४,९८,५५,000 मध्यम मुदत एफआरपी २९-५-१९ १७,७५,८४,000 १७,७५,८४,000 मध्यम मुदत एफआरपी ५ वर्षे ९,८५,९९,000 ९,८५,९९,000 (थकित रकमेपैकी मार्चअखेर भरावयाची रक्कम वेगळी आहे) जिल्ह्यातील अन्य थकबाकीदार संस्था निनाईदेवी साखर कारखाना : २२,३५,४६,000, गणपती संघ, तासगाव कारखाना : ८,८७,८२,000, नेर्ला बल्ब : ६,५४,२३,000, नेर्ला सोया : १,३४,६४,000, नेर्ला ग्राहक भांडार : ३0,८५,000, सद्गुरू संस्था, नेर्ले : १४,९१,000, निनाईदेवी ऊसतोडणी, वाहतूक संस्था : ६,0२,१७,000, प्रकाश अ‍ॅग्रो : ५,0४,४७,000, यशवंत ऊसतोडणी, वाहतूक संस्था : ३,४६,४७,000, माणगंगा ऊसतोडणी संस्था : ३,४१,६२,000, राजे विजयसिंह डफळे कारखाना : २,७२,७0,000, महाकंटेनर्स प्रा. कुपवाड : २,५७,९0,000, पार्श्वनाथ ट्रान्स्पोर्ट, सांगली : २,२८,४२,000, वसंत बझार : १,५२,४१,000.