शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर विकासाचा १२५ कोटींचा आराखडा

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

मुख्यमंत्र्यांना सादर होणार : आता लक्ष निधी मंजुरीकडे1

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर विकासाचा सुधारित आराखडा फोट्रेस कंपनीच्यावतीने सादर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील हा आराखडा १२५ कोटींचा असून, तो मुख्यमंत्र्यांसमोर सादर होणार आहे. आज, बुधवारी होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात या पहिल्या टप्प्यासाठीच्या निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. दहा दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांना अंबाबाई मंदिराच्या २५० कोटींच्या विकास आराखड्याचे तीन टप्पे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त अंबाबाई मंदिर परिसराचा विकास, भूसंपादन आणि नागरिकांचे पुनर्वसन यांचा समावेश करण्यास सांगितले होते. त्यानुसार फोर्ट्रेस कंपनीने पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा तयार केला आहे. १२५ कोटींचा हा आराखडा मुख्यमंत्र्यांपुढे सादर होऊन अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद केली जाईल. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. बैठकीत करण्यात आलेल्या सूचनेनुसार फोट्रेस कंपनीने अंबाबाई मंदिराचा १२५ कोटींचा सुधारित आराखडा तयार केला आहे. पालकमंत्री आणि मी दोघांनीही शासनाकडे निधीसाठीचा पाठपुरावा केला आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे.                                                                                                         - राजेश क्षीरसागर, आमदार