शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षिण’साठी १२५ कोटींचा निधी

By admin | Updated: May 8, 2016 00:47 IST

अमल महाडिक : जनतेच्या विश्वासावरच कामे

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मागच्या दीड वर्षात राज्य सरकारकडून १२५ कोटींचा निधी खेचून आणण्यात आपण यशस्वी झालो. आता ही सर्व कामे सुरू झाली आहेत, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ज्या विश्वासाने ‘दक्षिण’मधील जनतेने मला निवडून दिले, त्यास पात्र राहण्याचा तसेच त्यांची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण गेल्या दीड वर्षात केल्याचेही त्यांनी सांगितले. निवडून आल्यापासून जनतेचा विश्वास आणि मतदारसंघातील रखडलेला विकास या दोन गोष्टींची पुरेपूर जाणीव ठेवून आपण मतदारसंघातील प्रत्येक गावाचा, वाड्यावस्त्यांचा तसेच शहरातील प्रभागांचा अभ्यास केला. प्रत्येक गावात पायाभूत सुविधांबरोबरच कोणती विकासकामे करणे आवश्यक आहेत, त्याचे नियोजन केले आणि त्यानुसार निधी आणण्याचे प्रयत्न केले. निधीतून होणाऱ्या कामांचा कसलाही गाजावाजा न करता मतदारसंघातील प्रत्येक गाव व प्रभाग सुविधांनी युक्त बनला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून, या कामात आपणास राज्य सरकार तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांचे सहकार्य मिळत असल्याचे महाडिक यांनी सांगितले. रंकाळा तलाव, पंचगंगा नदी शुद्धिकरण, शाहू वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर रुग्णालय यासाठी पुढील वर्षभरात सुमारे १५० कोटींचा निधी आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे सांगत केवळ मतदारसंघच नाही तर संपूर्ण शहराच्या विकासाकरिता आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. जो निधी मिळाला आहे, त्यातून चांगल्या दर्जाची कामे व्हावीत यासाठी माझा आग्रह आहे. जर कामे खराब झाली तर ठेकेदारावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तलाव, विहिरी यामधील गाळ काढणे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, आॅक्सिजन पार्क उभारणे ही महत्त्वाची कामेही आपण लवकरच लोकसहभागातून हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)