शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

१२0 युवकांनी केले मुंडण

By admin | Updated: July 29, 2014 23:02 IST

धनगर समाज आरक्षण : जिल्हाधिकाऱ्यांना देणार काठी अन् घोंगडी

सातारा : धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील असतानाही राज्य शासनाच्या जाणीवपूर्वक वेळकाढूपणामुळे आणि चुकीच्या धोरणामुळे अनुसूचित (एसटी) संवर्गात सामील होऊ शकलेला नाही. त्याच्या निषेधार्थ अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्या १२0 हून अधिक युवक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडण करत शासनाचा निषेध केला. दरम्यान, संस्थेने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी गांधीगिरी मार्गाने जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना भेटणार असून यावेळी ते काठी आणि घोंगडी भेट देण्यात येणार आहेत. दरम्यान, अहिल्या सामाजिक विकास संस्थेचा मंगळवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या दिवशी सामुहिक मुंडण होणार असल्यामुळे असंख्य कार्यकर्ते येथे जमले होते. त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सामुहिक मुंडन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्याबरोबरच शासनाचा निषेधही व्यक्त करण्यात आला. अहिल्या सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मारुती जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना काठी आणि घोंगडी भेट देण्यात येणार आहे. सामुहिक मुंडण आंदोलनात बजरंग अवकिटकर, सदानंद माने, रमेश अवकिटकर, शामराव कोळपे, विकास कोकरे, संतोष माने, सुरज कोळपे, अमर कोळपे, संतोष शेलारे, दिनेश माळवदे आदी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)आंदोलनस्थळी बंदोबस्त नाही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणतेही आंदोलन असलेतरी तेथे पोलीस बंदोबस्त देण्यात येतो. मात्र, अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्या आंदोलनस्थळी कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त अथवा आरोग्य सुविधा पुरविण्यात आली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली आहे.