शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यावर फुलविली ११ एकर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:19 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सांडपाण्यावर प्रक्रिया करून शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागाने ११ एकर परिसरामधील बाग फुलविली आहे. दर दिवशी ८० हजार लिटर पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासह पाणी बचतीचे पर्यावरणपूरक पाऊल या माध्यमातून विद्यापीठाने टाकले आहे.वसतिगृहातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विद्यापीठ परिसरातील विविध बागांसाठी वापरण्याची संकल्पना राबविण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला. त्यानुसार सन २००७ मध्ये या विभागाने मुलींच्या वसतिगृहामागे पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पातून दर दिवशी ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया केलेल्या पाण्यातून ग्रंथालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतींसमोरील बगीचा, उत्तर बाजूचे सर्कल आणि त्यातील झाडे, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर आणि मुलींच्या वसतिगृहासमोरील बगीचा फुलविला आहे.दहा एकरांतील परिसर हिरवागार केला आहे. पहिला प्रकल्प यशदायी ठरल्याने सन २०१३ मध्ये तंत्रज्ञान अधिविभागातील मुले आणि मुलींच्या वसतिगृह परिसरात प्रतिदिन ३० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा जैविक प्रकल्प सुरू करण्यात आला.या प्रकल्पातील पाण्यातून या विभागाच्या परिसरातील सव्वा एकरमधील बगीचाला पाणीपुरवठा केला जातो.तिसरा प्रकल्प कार्यान्वितविद्यापीठातील विविध विभाग, कॅँटीनला प्रशासनाकडून ‘आरओ’ फिल्टर पाणी पुरविले जाते. ‘आरओ’तून जे क्षारयुक्त पाणी बाहेर पडते. ते वाया जाऊ नये यासाठी त्या परिसरात नारळाच्या झाडांची बाग केली आहे. आता गेल्या महिन्यात पाच बंगला परिसरात २० हजार लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा तिसरा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यातून उपलब्ध होणारे पाणी हे संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागासमोरील टेकडी आणि दूरशिक्षण केंद्राच्या परिसरातील झाडांना पुरविले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून मिळालेल्या पाण्यातून बगीचा, झाडे फुलविण्याचा विद्यापीठाचा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे.