शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

७ वर्षांत १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू!

By admin | Updated: December 4, 2015 00:23 IST

सातारा जिल्ह्याची धक्कादायक आकडेवारी : शासनाकडून ८६७ वारसांना ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत; विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रदीप यादव -- सातारा  सातारा जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत जवळपास १ हजार ५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. विदर्भ, मराठवाड्यापेक्षाही पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. यासाठी प्रत्येक बळीराजाचा विमा असणे गरजेचे बनले आहे. शासन पातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे धोरण राबविले जात आहे. या अनुषंगाने विविध योजना सुरु करण्यात आल्या असून आजपर्यंत मृत्यू पावलेल्या ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाने ८ कोटी ६७ लाख रुपयांची मदत दिली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती बिनभरवशाची झाली आहे. तरीही एक तरी हंगाम हाताला लागेल, या आशेने शेतकरी कर्ज काढून शेती पिकवतात. मात्र गेल्या दहा-बारा वर्षातील पर्जन्यमान पाहिले तर ऐन मोक्याला पावसाने घात केल्याचे पाहायला मिळते. जूनमध्ये कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबणीवर पडत राहिल्या. तर बरेचदा दुबार पेरणीचे संकट ओढवल्याचे प्रकार घडत आहेत. पेरण्या केल्यानंतर पीक काढायच्या वेळेलाच नेमका अवकाळी पाऊस येतो आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आणि जनावारांचा चारा सर्वकाही धुऊन नेतो, हेच गेल्या दहा वर्षातील चित्र आहे. शेतीत काही पिकत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे विवाह, घर बांधणे, आजारपण यासाठी शेतकरी कर्ज घेतात आणि या फेऱ्यातून त्यांची सुटका काही होत नाही. त्यामुळे आत्महत्येचेही प्रमाण वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने २०१५-१६ मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत संरक्षण रकमेमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकरी जितेंद्र शिंदे यांनी दिली. या योजनेचा कालावधी १२ महिन्यांचा असून १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत दिवसातील २४ तासांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्तीच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच अपघातावेळी त्यांचे वय किमान १० वर्षे व कमाल ७५ वर्षे असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांस अपंगत्व अथवा मृत्यू कोणत्याही प्रकारच्या अपघातानेच येणे आवश्यक आहे. विमा हप्त्याची रक्कम कंपनीस अदा...महसूल विभागाकडील नोंदीप्रमाणे १० ते ७५ वयोगटातील सुमारे १ कोटी ३७ लाख खातेदारांचा प्रतिशेतकरी १९.८९ रुपयेप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम शासनाने विमा कंपनीस अदा केली आहे. शेतकऱ्यास कोणतीही रक्कम अदा करावी लागणार नाही. अपघातग्रस्त शेतकरी व वारसांनी कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधून प्रस्ताव सादर करावे.- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, साताराया योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने, हल्ल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात याचा या योजनेत समावेश आहे.१८९ कुटुंबे मदतीपासून वंचित२००८-१५ या कालावधीत जिल्ह्यात एकूण १०५६ शेतकऱ्यांचा अपमृत्यू झाला आहे. पैकी ८६७ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत दिली आहे. शेजजमीन नावावर नसणे, जवळच्या व्यक्तीकडून खून, वाहन अपघातात वाहन चालविण्याचा परवाना नसणे आदी कारणांमुळे १८९ शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नुकसानभरपाईचे स्वरुप या योजनेच्या अपघात व नुकसानभरपाईचे स्वरूप असे आहे. अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे अथवा २ अवयव निकामी होणे, अपघातामुळे १ डोळा व १ अवयवय निकामी होणे यासाठी २ लाख रुपये व अपघातामुळे १ डोळा अथवा २ अवयव निकामी होणे, यासाठी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यईल.