शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

लाकूडवाडीतील १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

सदाशिव मोरे । आजरा लाकूडवाडी (ता. आजरा) येथील बाबू रानबा गिलबिले या १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. ...

सदाशिव मोरे । आजरा

लाकूडवाडी (ता. आजरा) येथील बाबू रानबा गिलबिले या १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. एका बाजूला गावातील कोरोनाबाधितांचा होणारा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला १०३ वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हारवून आपले जीवन पुन्हा एकदा सुरू केले आहे. आजऱ्यातील दोन्ही कोविड सेंटरनी आजोबांना दाखल करून घेतले नाही. तर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांनी मोठे हॉस्पिटलला घेवून जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुलगा व सून यांनी त्यांना शेतात आणले. शेतातील मुबलक ऑक्सिजन व वेळेवर मिळालेला फलाहार व भाजीपाला यामुळे आजोबा ठणठणीत झाले आहेत.

बाबू गिलबले यांना १८ मे रोजी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने आजरा कोविड सेंटरमध्ये आणण्यात आले. त्या ठिकाणी आॅक्सिजन बेड शिल्लक नाही. तीच अवस्था रोझरी सेंटरचीही होती. आजोबांची ऑक्सिजन पातळी ७० इतकी होती. त्यामुळे त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात यांना दाखल करण्यात आले. तेथे ऑक्सिजन लावल्यानंतर बाबू गिलबिले यांची ऑक्सिजन पातळी ८० पर्यंत गेली. मात्र त्या ठिकाणचे पेशंट पाहून बाबू गिलबिले अस्वस्थ झाले. मुलगा चंद्रकांत यांना घरी घेवून जाण्याची ते सारखी विनंती करू लागले व तोंडाचा ऑक्सिजन काढून टाकू लागले. कॉटला बांधून सर्व त्रास सहन करीत तीन दिवस त्या ठिकाणी बाबू गिलबिले यांना ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत मुलगा चंद्रकांतही तेथेच राहिले. मात्र नाईलाज झाल्याने मुलगा चंद्रकांत व सून वत्सला यांनी आजोबांना आपल्या शेतात घेवून जाण्याचा निर्णय घेतला. आजोबांना घेवूनच या दोघांनी शेतातच सेवा करणेस सुरुवात केली.

डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधे, नारळाचे पाणी, चिक्कू व आंब्याचा रस आणि सकाळ, संध्याकाळ अंडी खाण्यास दिल्यामुळे आजोबा ठणठणीत झालेत. आता त्यांची आॅक्सिजनची पातळी ९८ इतकी आहे. सध्या ते शेतात सर्वत्र फिरत असून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. त्यांनी कोरोनाला हरविले आहे.

लहानपणापासून बाबू गिलबिले हे मल्ल होते. लाठीकाठी, कबड्डी व मलखांबची त्यांना आवड होती. दहा वर्षांपूर्वी ते रायगडावर स्वत: चालत गेले आहेत.

उपचारासाठी गेले व मयत झाले...

लाकूडवाडी गावातील अनेकजण गडहिंग्लज येथे कोरोनाच्या उपचारासाठी गेले. उपचार सुरू असतानाच ८ जण मयत झाले आहेत. मात्र १०३ वर्षांचे बाबू गिलबिले या आजोबांनी कोरोनावर मात करून आपल्या जीवनाची नवीन इनिंग सुरू केली आहे.

--------------------------

* कोरोनाबाधित असतानाही मुलगा व सुनेकडून सेवा

जन्मदात्या वडिलांना कोरोनाच्या वॉर्डमध्ये एकट्यांना ठेवणे शक्य नाही. त्यातच सर्वत्र रुग्ण बघून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. आॅक्सिजन मास्क काढून सारखे त्रास देणे ही वडिलांचे सुरू झाले. त्यामुळे काही झाले तरी आपल्या शेतात घेवून जायचे व त्यांची सेवा करायची हाच निर्धार करून मुलगा चंद्रकांत व सून वत्सला यांनी बाबू गिलबिले यांना शेतात आणले व त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार व आहार दिल्यामुळे ते कोरोनामुक्त झाले आहेत.

-------------------------

* बाबू गिलबिले : ३००५२०२१-गड-०५