शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
2
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
3
"संतोष देशमुखांच्या हत्येला मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार"; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
4
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
5
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
6
रेपो दरात कपात, ५० आणि २० लाखांच्या लोनवर किती कमी होणार EMI? जाणून घ्या
7
परिस्थिती गंभीर! कोरोनापेक्षाही जीवघेणा 'हा' आजार; हृदयावरच आघात, दरवर्षी १८ मिलियन मृत्यू
8
९५ वर्षांचे आजोबा, ७० वर्ष राहत होते लिव्हइनमध्ये, आता झाली लग्न करायची इच्छा अन्...  
9
'स्पिरीट'नंतर दीपिका पादुकोण 'या' बिग बजेट सिनेमातूनही बाहेर? अभिनेत्रीच्या अटींमुळे मेकर्स विचारात
10
खळबळजनक! WhatsApp वर देवाचा फोटो DP; हनीट्रॅप, हेरगिरीसाठी पाकिस्तानचं 'देसी' प्लॅनिंग
11
Vijay Mallya : "हवं तर फरार म्हणा पण चोर म्हणू नका..," विजय माल्ल्यानं 'यांची'ही मागितली माफी
12
"लग्न झालं की लाइफ सेट असंच वाटायचं, पण...", लग्नाबद्दल स्पष्टच बोलली मधुराणी, म्हणाली...
13
Bengaluru Stampede : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; RCB च्या अधिकाऱ्यासह ४ जणांना अटक
14
देशातील निष्पाप नागरिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना पोसत होते, काश्मीरमधील 'त्या' ४ जणांना होणार शिक्षा!
15
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
16
महाराष्ट्राची 'समृद्धी': देशातील सर्वांत रुंद बोगद्यातून इगतपुरी-कसारा अंतर ८ मिनिटांत
17
NIrjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कोणते पदार्थ खाऊ नये, याची आजच नोंद करून घ्या!
18
भाजपासह काँग्रेसला खिंडार; माजी खासदार, पदाधिकारी अजित पवार गटात, NCPचे घड्याळ बांधले हाती
19
राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांच्या पत्नी रात्री जेवून झोपल्या, सकाळी उठल्याच नाहीत; सायलेंट हार्ट अटॅकने मृत्यू

ताराराणी महोत्सवात दहा लाखांवर उलाढाल

By admin | Updated: February 15, 2016 01:12 IST

खाद्यांवर मारला ताव : रविवारच्या सुटीमुळे खरेदीसाठी प्रचंड झुंबड

कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे ताराराणी महोत्वात विविध वस्तू खरेदीसाठी आणि पाहण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहिली. विशेषत: नोकरदार मंडळी कुटुंबासह गर्दी खरेदी करताना दिसत होते. गरमागरम खाद्यांवर ताव मारण्याकडे खवय्यांचा कल अधिक राहिला. येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात सुरू असलेल्या महोत्सवात दोन दिवसांत दहा लाखांवर उलाढाल झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जिल्हास्तरीय ‘ताराराणी महोत्सव २०१६’ शुक्रवार (दि. १२)पासून सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांतून आणि कोकणातून महिला बचत गटांनी महोत्सवात सहभागी झाले आहेत. बचत गटांतर्फे तयार केलेल्या वस्तूंचे, उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. सकाळी ११ पासून रात्री उशिरापर्यंत खाण्याच्या स्टॉल्सवर गर्दी होती. दहा रुपयांतही खाण्याचे ताजे पदार्थ मिळत असल्यामुळे ग्राहक खाद्य स्टॉल्सजवळ रेंगाळत होते. बेळगावची प्रसिद्ध मसूर, नाचणी, चिवडा, जयसिंगपूरचे भडंगही आहे. सहेली महिला बचत गटांनी तयार केलेले विळे, खुरपे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. बाजारपेठेपेक्षा कमी किमतीत विविध आकाराचे विळे शेतकरी खरेदी करताना दिसत होते. (प्रतिनिधी)पुरणपोळीचे कुतूहल..नाशिकचे प्रसिद्ध मांडे (पुरणपोळी) कसे बनवले जाते, याबद्दल अनेकांत कुतूहल जाणवले. साठी ओलांडलेल्या एक आजीबाई अतिशय कौशल्याने पुरणपोळी न लाटता हातावर फिरवून करत होत्या. पुरणपोळी पहिल्यापासून शेवटपर्यंत कशी तयार होते, ते अनेक महिला थांबून बारकाईने निरीक्षण करत होत्या.