शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

सराफ व्यावसायिकांना तब्बल दहा कोटींचा गंडा

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

गुजरीत अस्वस्थता : संशयित ओसवाल शुक्रवारपासून बेपत्ता

कोल्हापूर : सराफ बाजारपेठेतील मोठी उलाढाल असणाऱ्या १० ते १२ व्यावसायिकांना एका व्यक्तीने १० कोटींचा गंडा घातला असल्याची चर्चा गुजरी सराफ बाजारात सुरू आहे. आनंद ओसवाल असे या गंडा घालणाऱ्याचे नाव असून गेली वीस वर्षे इमानदारीने सराफांकडून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन त्याची बाहेर राज्यातील गावोगावी विक्री केल्यानंतर संबंधितांचे पैसे चुकते करणारा ओसवाल गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने अनेकांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. गुजरी बाजारपेठेत गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा प्रकार घडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगावचा रहिवासी असलेला आनंद ओसवाल वीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात आला. निर्व्यसनी, सज्जन अशी ओळख असलेल्या आनंदचे काही नातेवाईकही कोल्हापुरात राहतात. त्यामुळे आनंदवर कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांचा पटकन विश्वास बसला. सुरुवातीला काही वर्षे नातेवाईकांसोबत भागीदारीत सराफ व्यवसाय केला, परंतु नंतर नातेवाईकांशी न पटल्याने बाजारपेठेतील स्वत:च्या ‘गुडविल’वर त्याने स्वत:च व्यवसाय सुरू केला. सराफाकडून सोने-चांदीचे दागिने घ्यायचे आणि बाहेर राज्यातील गावोगावी त्याची विक्री करून दोन आठवड्यांनी संबंधितांचे पैसे भागवायचे, असे त्याच्या कामाचे स्वरूप होते. त्याच्या प्रामाणिकपणावर शहरातील व्यावसायिकांकडून माल सहज मिळत गेला. त्यात काही लहान व्यापारीही त्याच्याकडे उधारीवर माल देऊ लागले. काही दिवसांपूर्वी ओसवाल याच्याकडील आठ किलो सोने चोरीस गेल्याची चर्चा होती परंतु त्याने कोणालाही न सांगता व्यवसाय वाढवून एक दिवस सराफांचे देणे भागवू, अशी मनाची तयारी केली होती. त्याचीही चर्चा आता गुजरी बाजारपेठेत सुरू आहे. गेल्या शुक्रवारपासून ओसवाल गायब असून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. ज्यांनी त्याच्याशी व्यवहार केले आहेत त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो झालेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्या बेपत्ता होण्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. आपण फसलो असल्याच्या शक्यतेमुळे व्यावसायिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओसवाल याने गंडा घातला की अन्य काही घडले आहे, याचे स्पष्टीकरण तो परत आल्याशिवाय होणार नाही. ओसवाल परत येईल, अशी प्रतीक्षा सराफ व्यावसायिकांना आहे. (प्रतिनिधी)