आरोग्य केंद्रांवर ऑफलाइन पध्दतीनेही लसीकरण केले जात आहे. तसेच प्रत्येक गावात शिबिर घेऊन लस दिली जाणार आहे. यासाठी महिला व बालविकास, शिक्षण, ग्राम विकास, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय व गृह या विभागांचा सहभाग घेतला जात आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाचे अपेक्षित लाभार्थी १८ लाख ५२ हजार ३६८ असून त्यापैकी ७ लाख २६ हजार ७१९ जणांनी पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण ३९ टक्के इतके आहे. तर ४७ हजार ४२८ जणांनी दुसरा डोस घेतला असून हे प्रमाण ७ टक्के आहे़ या वयोगटाचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
---
पात्र लाभार्थी : ३१ लाख २६ हजार ९१७
पहिला डोस घेतलेले नागरिक : २० लाख ५७९ (६४ टक्के)
दुसरा डोस घेतलेले नागरिक : ८ लाख ५४ हजार ३५१ (४३ टक्के)
लस घेतलेले एकूण नागरिक : २८ लाख ५४ हजार ९३०
----