शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ब्रिटनहून आलेली एक तरुणी कोरोना पॉझिटिव्ह; कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 15:37 IST

तरुणीच्या स्वॅबचा अहवाल पुण्याला पाठवणार; आरोग्य विभागाची माहिती

कल्याण- इंग्लंडहून कल्याण डोंबिवली आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २० जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एकाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. टेस्ट पॉझिटिव्ह आलेली रुग्ण ही महिला आहे. तिचा अहवाल आत्ता मुंबईनंतर पुण्याला पाठविला जाणार आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पुण्याचा अहवाल काय येतो याकडे कल्याण डोंबिवलीचे लक्ष लागले असून तो अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर कल्याण डोंबिवलीची चिंता वाढू शकते.इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन दिसून आल्याने खबरदारीचा उपाय योजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या ५५ जणांची यादी महापालिकेस सरकारने दिली होती. या यादीत काही नावे डबल होती. तसेच काही जण हे कल्याण डोंबिवली क्षेत्राबाहेरील होते. त्यानुसार महापालिकेने ४५ जणांचे सर्वेक्षण केले. एकूण ४५ जणांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यापैकी सात जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र रात्री उशिरा एका महिलेचा टेस्ट रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट मुंबईतील एनआयव्हीला पाठविला गेला. त्याठिकाणी तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट आत्ता पुण्यातील एनआयव्हीला पाठविला गेला आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेली रुग्ण ही १९ वर्षाची तरुणी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यात इतर कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तिचा अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीकरीता पुण्याला  पाठविण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या सगल जोडून आलेल्या आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. घराबाहेर पडताना न चुकता मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. काही लक्षणे आढळून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या